आंबा खिंडीत आज तिसऱ्यांदा कमान उभी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST2021-09-23T04:28:03+5:302021-09-23T04:28:03+5:30
घाटात तीन ठिकाणी रस्ता खचला असतानाही बेकायदेशीरपणे अवजड वाहने गेली. आंबा येथे पोलीस बंदोबस्त नसल्याने वाहनधारकांनी कमान पाडण्याचे ...

आंबा खिंडीत आज तिसऱ्यांदा कमान उभी
घाटात तीन ठिकाणी रस्ता खचला असतानाही बेकायदेशीरपणे अवजड वाहने गेली. आंबा येथे पोलीस बंदोबस्त नसल्याने वाहनधारकांनी कमान पाडण्याचे धाडस केले. घाट उतरताच मुर्शी येथे पोलीस पथक कार्यरत आहे. येथून या वाहनांना पुढे कसे सोडले, असा प्रश्न विचारला जात आहे.
पाऊस कमी होताच घाटात खचलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करीत असल्याचे बांधकाम विभागातून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात बांधकाम थंडच आहे.
चौकटीसाठी...
प्रवाशांची लूट
एसटी सेवा बंद असल्याने कोल्हापूर रत्नागिरी असा मारुती व्हॅनव्दारे प्रवास चालू आहे. १७० रुपये तिकीट दर असताना खासगी वाहने ३०० रुपये प्रवाशांकडून उकळत आहेत. खचलेल्या ठिकाणी एकेरी वाहतूक ठेवून दिवसा बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.