आज राखी पौर्णिमा, पूर्वसंध्येला खरेदी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:27 IST2021-08-22T04:27:16+5:302021-08-22T04:27:16+5:30
कोल्हापूर : भावाबहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारी त्यांच्यातील प्रेमाचे बंध अधिक दृढ करणारी राखी पौर्णिमा आज रविवारी सर्वत्र साजरी होत ...

आज राखी पौर्णिमा, पूर्वसंध्येला खरेदी जोरात
कोल्हापूर : भावाबहिणीच्या नात्याचा गोडवा जपणारी त्यांच्यातील प्रेमाचे बंध अधिक दृढ करणारी राखी पौर्णिमा आज रविवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त पूर्वसंध्येला बाजारपेठेत आकर्षक राख्यांच्या खरेदीसाठी मुली-महिलांनी गर्दी केली होती. दुसरीकडे बहिणीला ओवाळणी देण्यासाठी गिफ्ट शॉपी, कपडे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांच्या दुकानात ग्राहकांची रेलचेल होती. कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर आलेल्या या सणाला नागरिकांना मोकळेपणाने हा दिवस साजरा करता येणार आहे.
रक्षाबंधन या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी तिच्या सदैव पाठीशी राहण्याचे वचन देतो. तीन महिन्यांच्या कोरोना संसर्गाने आता थोडी पाठ सोडल्याने कोल्हापूरकरांना हा सण अधिक मोकळेपणाने साजरा करता येत आहे. यानिमित्त बाजारपेठेत कुंदन, स्पंज, चांदीच्या राख्या दाखल झाल्या आहेत. ब्रेसलेट पद्धतीच्या राख्या नंतरदेखील वापरता येत असल्याने त्यांना विशेष मागणी आहे. लहान मुलांसाठी डोरेमॉन, शिनचॅन, लिटल सिंघम, भीम अशा सुपर हीरोंच्या व कार्टूनच्या राख्यांची धूम आहे. बहिणीला ओवाळणी देण्यासाठी गिफ्ट शाॅपी, कुर्ती, फॅशनेबल ड्रेस, साड्यांच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी आहे.
----------------
फोटो नं २१०८२०२१-कोल-राखी पौर्णिमा०१,०२
ओळ : भावाबहिणीच्या नात्याचे बंध अधिक दृढ करणारी राखी पौर्णिमा आज रविवारी साजरी होत आहे. यानिमित्त सणाच्या पूर्वसंध्येला शनिवारी कोल्हापुरातील बाजारपेठेत महिलांनी राख्यांची खरेदी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
---