शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

Navratri २०२५: खंडे नवमीला कोल्हापुरातील अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:42 IST

दशमहा विद्या रूपातील ही पाचवी देवता

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात खंडे नवमीला आज, बुधवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची भैरवी माता रूपात पूजा बांधण्यात आली. तसेच खंडेनवमीनिमित्त अंबाबाईच्या शस्त्रांचे पूजन करण्यात आले. दशमहा विद्या रूपातील ही पाचवी देवता आहे.अष्टमीला झालेल्या जागराच्या होममुळे बुधवारी अंबाबाईचे मंदिर सकाळी साडेआठनंतर उघडले. अंबाबाईचा अभिषेक, आरती झाल्यानंतर भैरवी मातारूपात देवीची पूजा बांधण्यात आली.हजारो उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा प्रखर तेजस्वी वर्ण आहे, जिच्या केशजटांमध्ये चंद्रकला शोभत आहे, रक्तचंदनरंजित जिच्या चारही हातात जपमाळा, ग्रंथ, अभय व वरदहस्त शोभत आहेत, जी त्रिनेत्री असून, मंदस्मित मुखमंडल आहे.जेव्हा महाकाली माता स्वतः मूळ रूपात व्यक्त होण्याच्या इच्छेने, काही काळ गुप्त झाली. तेव्हा शिवांनी कालीमातेला शोधण्यासाठी देवर्षी नारदांना आज्ञा केली, शिवाज्ञेनुसार नारदांना सुमेरू पर्वताच्या उत्तरेस श्री देवीमाता दिसली, तेव्हा तिच्यासमोर नारदांनी शिवांशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा तिच्या शरीरातून एका सुकोमल, तेजस्वी षोडशवर्षी युवती प्रगट झाली, श्री काली मातेच्या शरीरातून व्यक्त झालेल्या, या छायाविग्रहास ‘त्रिपुरभैरवी’ म्हणतात. श्री दक्षिणामूर्ति अथवा श्री बटुकनाथ हे हिचे भैरव आहेत, मार्गशीर्ष पौर्णिमेस प्रगट झालेली, ही देवी श्रीकुलातील असून, उत्तराम्नायपीठस्था आहे.त्रिपुरभैरवी, कोलेशीभैरवी, रुद्रभैरवी, चैतन्यभैरवी, क्रियाभैरवी, सिद्धिभैरवी, कामेश्वरीभैरवी, षट्कुटाभैरवी इ. या देवीचे उपासनाभेद व प्रकार आहेत. हिच्या उपासनेने संकटनाश, इंद्रियविजय, सर्वत्र उत्कर्ष प्राप्ती, शत्रुनाश, सकलसिद्धिलाभ, आरोग्यप्राप्ती, सौख्यलाभ इ. लाभ होतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Ambabai: Bhairavi Mata form worshipped on Khande Navami in 2025

Web Summary : On Khande Navami, Kolhapur's Ambabai was worshipped as Bhairavi Mata, a form of Dashamahavidya. Her weapons were also worshiped. The goddess embodies radiance and power, offering devotees protection and prosperity.