आज मध्यरात्रीपासून एस. टी.ची भाडेवाढ
By Admin | Updated: July 31, 2014 00:47 IST2014-07-31T00:43:01+5:302014-07-31T00:47:22+5:30
अत्यल्प वाढ : डिझेल दरवाढीमुळे निर्णय

आज मध्यरात्रीपासून एस. टी.ची भाडेवाढ
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ सूत्रात अंतर्भूत असणाऱ्या डिझेल दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रवासी वाहतूक सेवांच्या प्रवासभाड्यात आज, बुधवारी मध्यरात्रीपासून ०.८१ टक्के भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे साध्या/जलद आणि रात्रीसेवेमध्ये प्रती सहा कि.मी.साठी ५ पैसे, तर निमआराम सेवेत प्रती सहा कि.मी.साठी १० पैसे अशी अत्यल्प वाढ होणार आहे.
ज्यांनी ३१ जुलैपूर्वी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशांकडून सुधारित भाड्यापोटी होणारी फरकाची रक्कम बसमध्ये वाहकामार्फत आकारण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभाग नियंत्रक सुहास जाधव यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
एस. टी.ची नवीन सुधारित भाडेवाढ अशी (दर प्रती कि.मी./रुपयांत)
सेवा प्रकार सध्याचे प्रवासी दर नवीन प्रवासी दर
साधी (साधी/ मिडी)६.२० ६.२५
जलद६.२० ६.२५
रात्रसेवा ७.३५ ७.४०
निमआराम८.४५ ८.५५
वातानुकूलित - निमआराम ११.४०११.५०
वातानुकूलित - शिवनेरी १५.५५ १५.७०
वातानुकूलित - शिवनेरी स्लिपर१५.७०१५.८५