‘गडहिंग्लज’ला काळभैरवाचा जयघोष-यात्रेचा आज मुख्य दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:22 IST2019-02-21T00:22:11+5:302019-02-21T00:22:18+5:30
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाच्या पालखीची मिरवणूक बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. ...

‘गडहिंग्लज’ला काळभैरवाचा जयघोष-यात्रेचा आज मुख्य दिवस
गडहिंग्लज : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री काळभैरवाच्या पालखीची मिरवणूक बुधवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. ‘चांगभलं’च्या गजरात ‘श्रीं’ची पालखी रात्री डोंगरावरील मंदिरात दाखल झाली. आज, गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे.
दुपारी चार वाजता शिवाजी चौकातील श्री. काळभैरी मंदिरापासून ‘काळभैरी...बाळभैरी...भैरीच्या नावानं चांगभलं’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात ‘श्रीं’च्या पालखीची सवाद्य मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्याहस्ते पालखी पूजन झाले. नेहरू चौक, वीरशैवमार्गे पालखी काळभैरी वेशीत आली. प्रथेप्रमाणे त्याठिकाणी ‘श्रीं’ची आरती झाली. त्यानंतर मिरवणूक पुन्हा डोंगराकडे मार्गस्थ झाली. मिरवणुकीच्या मार्गावर हजारो भाविकांनी व तरुणांनी सासनकाठ्यांना भक्तिभावाने लहान-मोठे गोंडे बांधण्यासाठी गर्दी केली. मिरवणुकीत अनेक तरुण मंडळाचे ढोलपथक सहभागी झाले होते.
मध्यरात्री ‘श्रीं’ची शासकीय पूजा झाली. त्यानंतर ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली. डोंगरावरील प्रवेशद्वार ते मंदिरापर्यंत भाविकांसाठी मंडप घालण्यात आला आहे. येण्या-जाण्याचा मार्ग स्वतंत्र ठेवण्यात आला असून थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.