शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तेरा ग्रामपंचायतींना आज संगणक-प्रिंटर प्रदान : कोल्हापुरात समारंभ -सतेज पाटील यांचा स्थानिक निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:00 IST

‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना आज, गुरुवारी (दि. ३१) आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर

कोल्हापूर : ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना आज, गुरुवारी (दि. ३१) आमदार सतेज पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर देण्यात येणार आहे. आमदार पाटील यांच्याच हस्ते सकाळी ११ वाजता शिवाजी उद्यमनगरातील रामभाई सामाणी हॉलमध्ये हा समारंभ होत आहे.

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने गौरविण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटर देण्याची घोषणा आमदार पाटील यांनी केली होती. त्यांनी जिल्हा नियोजन विभागाकडे त्याचा पाठपुरावा करून ६ लाख ३६ हजार रुपये मंजूर करून घेतले. त्यातून ही साधने ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहेत.

‘लोकमत’च्या वतीने यावेळी कृतज्ञता म्हणून आमदार पाटील यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. संगणक प्रदान सोहळ्यास ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्या ग्रामपंचायतींचा गौरव झाला होता, त्यांनी सरपंच-उपसरपंच व सर्व सदस्यांसह या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार पाटील व लोकमत परिवारातर्फे करण्यात आले आहे.‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ विजेतेसरपंच आॅफ द इयर - शिरोळ (ता. शिरोळ)उदयोन्मुख नेतृत्व - गोरंबे (ता. कागल)प्रशासन-ई प्रशासन - शिरोली पुलाची (ता. हातकणंगले)जलव्यवस्थापन - सांगरूळ (ता. करवीर)वीज व्यवस्थापन - किणी (ता. हातकणंगले)शैक्षणिक सुविधा - मुदाळ (ता. भुदरगड)स्वच्छता - उत्तूर (ता. आजरा)पायाभूत सुविधा - नेसरी (ता. गडहिंग्लज)ग्रामरक्षा - भादवण (ता. आजरा)आरोग्य - ऐनापूर (ता. गडहिंग्लज)कृषी, तंत्रज्ञान - गडमुडशिंगी (ता. करवीर)पर्यावरण - लाटवडे (ता. हातकणंगले)रोजगार निर्मिती - नांदणी (ता. शिरोळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद