आमदार ऋतुराज पाटील यांचा आज वाढदिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:46+5:302021-05-31T04:18:46+5:30

कोल्हापूर : येथील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांचा आज, सोमवारी वाढदिवस आहे. या दिवशी गरजूंना मदत ...

Today is the birthday of MLA Rituraj Patil | आमदार ऋतुराज पाटील यांचा आज वाढदिवस

आमदार ऋतुराज पाटील यांचा आज वाढदिवस

कोल्हापूर : येथील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांचा आज, सोमवारी वाढदिवस आहे. या दिवशी गरजूंना मदत ही संकल्पना घेऊन कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार यांनी आपल्या भागातील, परिसरातील, गावातील गरजू लोकांना कोणत्याही स्वरूपात शक्य असेल त्याप्रमाणे मदत करावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील हे वाढदिवस साजरा करणार नाहीत. कोरोनामुळे समाजातील अनेक लोकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजंदारी करून पोट भरणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवणसुद्धा मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे या गरजू लोकांना धान्य वाटप, जेवण, कोणत्याही स्वरूपाची मदत करून त्यांना आधार द्यावा. शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी कोविड सेंटर सुरू आहेत. या ठिकाणी जर काही साहित्याची गरज असेल तर ते साहित्य द्यावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

Web Title: Today is the birthday of MLA Rituraj Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.