शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगाला कनेक्टिव्हिटी देणार, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 14:21 IST

सन २०३० पर्यंत जगातील ३ नंबरची शक्ती भारत असेल.

इचलकरंजी : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, त्यावर काम सुरू आहे. वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल व नारायण राणे यांच्याशी यासंदर्भात विचारविनिमय सुरू आहे. मॅँचेस्टरनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वस्त्रनगरीला देशपातळीवर कनेक्टिव्हिटी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पत्रकार बैठकीत दिले.पूर्वी शंभर, दोनशे आरपीएमचे यंत्रमाग होते. आता १२०० ते १५०० आरपीएमचे यंत्रमाग आले. त्यातून उत्पादन क्षमता वाढली आहे. येथील काही व्यापारी आपले उत्पादन परदेशात पाठवतात. तेथून ते ब्रॅण्डेड म्हणून पुन्हा भारतात येते. त्याला चालना देण्यासाठीही आमचे प्रयत्न आहेत. काही व्यापारी व कार्यकर्त्यांनीही याबाबत मागणी केली आहे.कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरण करण्याचे नियोजन आहे. कोल्हापुरातून पाच ठिकाणी विमान उड्डाण सुरू आहे. त्याची कनेक्टिव्हिटी वाढविण्याचे काम सुरू आहे. देशात परिवर्तन होत आहे. सन २०३० पर्यंत जगातील ३ नंबरची शक्ती भारत असेल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी ठेवून कार्य करीत आहेत, अशी माहिती दिली.दरम्यान, भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सिंधिया म्हणाले, कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये कमळ फुलविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने मोट बांधून कामाला लागावे. तळागाळातील लोकांपर्यंत भाजपचे काम पोहोचवा. त्यातून याठिकाणी कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. केंद्राने गाव तिथे प्रगती अशी संकल्पना राबवली आहे.

ग्रामीण भागाचा विकास तरच शहराचा विकास, यामुळे ग्रामीण भागातील अडीअडचणींकडे केंद्र सरकारने आता लक्ष घालणे सुरू केले आहे. सबका साथ, सबका विकास हवा असेल, तर सबका प्रयास गरजेचा आहे. यावेळी आमदार गोपीनाथ पडळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिवतीर्थवर स्वागतइचलकरंजीत मंत्री सिंधिया यांचे शिवतीर्थावर ढोल वाजवत फुले उधळून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इचलकरंजीसह हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.लिफ्ट बंदशिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सन १९६७ साली राजमाता विजयाराजे शिंदे (ग्वाल्हेर) यांनी केले होते. त्या ज्योतिरादित्य यांच्या आजी होत. तेथे अभिवादन करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी धन्यवाद व्यक्त केले. परंतु, ढिसाळ नियोजनामुळे लिफ्ट बंद असल्याने त्यांना महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करता आला नाही. त्यांना खालूनच अभिवादन करून परतावे लागले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेTextile Industryवस्त्रोद्योग