शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलावंत मानधन ५ महिने थकीत, कोल्हापूर जिल्ह्यात ११८४ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:37 IST

राज्य शासनाच्या वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाला निधीच वर्ग न केल्याने राज्यभरातील वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले आहे. किमान औषधपाण्यासाठी तरी हे मानधन उपयोगाला येत होते. मात्र ते रखडल्याने ही मंडळी हवालदिल झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ११८४ वृद्ध साहित्यिक आणि कलाकार असून राज्यभरात किमान पंचवीस हजारांहून जास्त कलावंतांना त्याचा लाभ होतो. या योजनेतून अ, ब आणि क या तीन गटांमध्ये साहित्यिक आणि कलाकार यांची वर्गवारी करून त्यानुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५०० रुपये मानधन दरमहा देण्यात येते.

ठळक मुद्देवृद्ध कलावंत मानधन ५ महिने थकीत, कोल्हापूर जिल्ह्यात ११८४ लाभार्थी

समीर देशपांडे ।कोल्हापूर : राज्य शासनाच्या वित्त विभागाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाला निधीच वर्ग न केल्याने राज्यभरातील वृद्ध कलाकारांचे मानधन रखडले आहे. किमान औषधपाण्यासाठी तरी हे मानधन उपयोगाला येत होते. मात्र ते रखडल्याने ही मंडळी हवालदिल झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ११८४ वृद्ध साहित्यिक आणि कलाकार असून राज्यभरात किमान पंचवीस हजारांहून जास्त कलावंतांना त्याचा लाभ होतो. या योजनेतून अ, ब आणि क या तीन गटांमध्ये साहित्यिक आणि कलाकार यांची वर्गवारी करून त्यानुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५०० रुपये मानधन दरमहा देण्यात येते.मान्यवर वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना मानधन देण्याची ही योजना शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १९५५ पासून सुरू आहे. या कलावंतांना या मानधनाचा खूप उपयोग होतो. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील त्या साहित्यिकांचे, कलाकारांचे कार्य पाहून ही वर्गवारी ठरविण्यात येते. हे अनुदान जरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून अदा केले जात असले तरी या साहित्यिक, कलाकार यांची निवड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाद्वारे करण्यात येते. त्यासाठी शासनाने अशासकीय सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे. ती दरवर्षी अर्ज मागवून घेते आणि ६० नवीन कलाकारांची निवड करते.

या योजनेतून मानधन घेत असलेल्या पुरुषाचे निधन झाल्यास त्यांच्या पत्नीला किंवा पत्नीचे निधन झाल्यास पतीला मानधन देण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील ३५, ४८ आणि ११०१ साहित्यिक आणि कलाकार अनुक्रमे अ, ब, क वर्गवारीमध्ये मोडतात. जानेवारी २०१९ चे मानधन सर्वांच्या खात्यावर जमा झाले.

गेले पाच महिने मानधन नसल्याने कलेची अव्याहत सेवा केलेल्या कलाकारांच्या आयुष्याची संध्याकाळ उपासमारीने जात आहे. अनेक वृद्धांकडे उपचारांसाठी पैसे नाहीत. जगण्यासाठी कसरत करावी लागते; पण कुणालाही त्याची पर्वा नाही.मात्र त्यानंतर मात्र या मानधनाची प्रतीक्षा आहे.

भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते

साहित्यिक आणि कलाकार यांचे मानधन थकल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. हे मानधन मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही याबाबत लवकरच भेट घेणार आहोत.- मेघराज भोसले, अध्यक्ष,अ. भा. चित्रपट महामंडळ, कोल्हापूर-

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर