‘कायदे पाळा असे सांगण्याची वेळ’... ७५ जणांची नेमणूक; पण...

By Admin | Updated: September 10, 2014 00:27 IST2014-09-10T00:05:48+5:302014-09-10T00:27:43+5:30

सतेज पाटील : इचलकरंजीत नवीन शहापूर पोलीस ठाण्याचे उद्घाटन

Time to say 'keep the law' ... 75 appointments; But ... | ‘कायदे पाळा असे सांगण्याची वेळ’... ७५ जणांची नेमणूक; पण...

‘कायदे पाळा असे सांगण्याची वेळ’... ७५ जणांची नेमणूक; पण...

कासा: डहाणू तालुक्यातील कासा जवळील शेकडो गावातील शेतीला पाणीपुरवठा करणारे सूर्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने कासा परिसरातील गावात पुरस्थिती निर्माण झाली आहे. धरणातून ८००० क्युसेक पाणी सोडले आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू व विक्रमगड तालुक्यातील शेकडो गावांना उन्हाळ्यात सूर्या धरणातून कालव्याअंतर्गत भातशेतीला पाणीपुरवठा केला जातो. सदर धरणाअंतर्गत सुमारे १४.६९६ हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. सूर्या धरण गेल्या आठवडाभरापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णपणे भरले आहे. सदर धरणातील पाणी पातळी क्षमता ११८.६० मी. आहे. मात्र अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी सुमारे ११९.४० एवढी झाली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी आटोक्यात आणण्यासाठी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरणाच्या वरील गावपाड्यांनाही पूराचा धोका निर्माण झाला आहे.
सूर्या धरणातून सोमवारी संध्याकाळी ४ वाजेपासून पाणी सोडल्याने सूर्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नाले, ओहोळ यांनाही पूर आला आहे. त्यामुळे कासा परिसरातील गावपाड्यावरचा संपर्क तुटला होता. तर पूल, रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली होती. सूर्या नदीवरील पेठ-म्हसाड जवळील पूल दोन दिवसापासून पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीकाठील भातशेतीही काही ठिकाणी पाण्याखाली गेली आहे. (वार्ताहर)

Web Title: Time to say 'keep the law' ... 75 appointments; But ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.