शिरोळमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST2021-02-23T04:37:08+5:302021-02-23T04:37:08+5:30

शिरोळ : वीज बिलप्रश्नी महावितरण आणि राज्य शासनाच्या विरोधात शिरोळ तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर शिरोळ शहरात मात्र ...

Tightly closed at the top | शिरोळमध्ये कडकडीत बंद

शिरोळमध्ये कडकडीत बंद

शिरोळ : वीज बिलप्रश्नी महावितरण आणि राज्य शासनाच्या विरोधात शिरोळ तालुका बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर शिरोळ शहरात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. लॉकडाऊन काळातील भरमसाठ बिले, चुकीचे आकारण्यात आलेले इतर कर, ग्राहकांना कोणतीही नोटीस न देता वीजतोडणी केल्याच्या निषेधार्थ बंदचे आवाहन केले होते.

महावितरणकडून मनमानी पद्धतीने व दमदाटी करून अवास्तव दिलेली वीज बिले वसुली केली जात आहेत. लॉकडाऊन काळात आलेली भरमसाठ बिले, चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आलेले इतर कर, बेकायदेशीर आकारण्यात आलेला स्थिर आकार, बिले दुरुस्त न करता वीज तोडली जात आहे. महावितरणच्या या बेकायदेशीर कृतीविरोधात आंदोलन अंकुशने सोमवारी शिरोळ तालुका बंदची हाक दिली होती. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंकुशने दिला आहे. शिरोळ शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला.

फोटो - २२०२२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - शिरोळ शहरात सोमवारी महावितरण आणि राज्य शासनाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (छाया : सुभाष गुरव, शिरोळ)

Web Title: Tightly closed at the top