‘अनंत चतुर्दशी’ मिरवणुकीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:53+5:302021-09-18T04:26:53+5:30

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीच्या विसर्जनकरिता शासन निर्देशानुसार मंडळांना मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने विसर्जन करावे लागणार आहे. या निर्बंधांचे ...

Tight police security for 'Anant Chaturdashi' procession | ‘अनंत चतुर्दशी’ मिरवणुकीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त

‘अनंत चतुर्दशी’ मिरवणुकीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कोल्हापूर : अनंत चतुर्दशीच्या विसर्जनकरिता शासन निर्देशानुसार मंडळांना मिरवणूक न काढता साध्या पद्धतीने विसर्जन करावे लागणार आहे. या निर्बंधांचे पालन होती की नाही हे पाहण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी खास कोल्हापूरसह इचलकरंजी शहरासह जिल्ह्यात स्वत:सह दोन अपर पोलीस अधीक्षक व अधिकारी कर्मचारी, असा एकूण ३१८४ जणांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्या, रविवारी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक न काढता गर्दी टाळून आपल्या मंडळाचे गणपती विसर्जन करावे. याकरिता शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यांचे तंतोतंत पालन व्हावे. याकरिता जिल्हा पोलीस दलाच्यावतीने मिरवणुकीसाठी कोल्हापूर व इचलकरंजी शहरासह सर्व जिल्ह्यात बंदोबस्त तैनात केला आहे. यात कोल्हापूर शहराकरिता स्वत: पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, तीन पोलीस उपअधीक्षक, बारा पोलीस निरीक्षक, पंचेचाळीस सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, ६२६ स्त्री-पुरुष कर्मचारी आणि ५२९ गृहरक्षक दलाचे जवान असे ११८९ कर्मचारी तैनात केले आहेत.

इचलकरंजीलाही एक अपर पाेलीस अधीक्षक, एक उपअधीक्षक, तीन पोलीस निरीक्षक व दहा पोलीस अधिकारी, १५२ पोलीस कर्मचारी आणि २९५ गृहरक्षक दलाचे जवान असे ४६२ कर्मचारी तैनात केले आहेत. ही दोन्ही शहरे वगळून अन्यत्र १४ वरिष्ठ अधिकारी व ३२ सहायक पाेलीस निरीक्षक आणि ८४६ पोलीस कर्मचारी, ६७६ गृहरक्षक दलाचे जवान असा १४६८ जणांचा बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय राज्य राखीव दलाची एक कंपनी, स्ट्रायकिंग फोर्स - २०, प्लाटून-३, क्यूआरटी फोर्स - ८, आरसीपी फोर्स -८, यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.

Web Title: Tight police security for 'Anant Chaturdashi' procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.