जयसिंगपुरात सापडले वाघाचे कातडे
By Admin | Updated: June 22, 2014 00:36 IST2014-06-22T00:36:39+5:302014-06-22T00:36:39+5:30
वाघाची एक नखी जप्त

जयसिंगपुरात सापडले वाघाचे कातडे
जयसिंगपूर : शहरातल राजीव गांधीनगरमध्ये वाघाचे कातडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. बाळूमामा मंदिरालगत असणाऱ्या संरक्षक भिंतीलगत कातडे व वाघाची एक नखी पोलिसांनी जप्त केली. मिळालेले हे कातडे वाघाचे की अन्य कोणत्या वन्य प्राण्याचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंदिरालगत असणाऱ्या संरक्षक भिंतीलगत असणाऱ्या छोट्याशा गटारीमध्ये हे कातडे पडल्याचे येथील नागरिकांना दिसल्यानंतर जयसिंगपूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. प्राथमिक तपासात वाघाचे कातडे म्हणून पोलिसांनी नोंद केली असून, रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही सुरू होती. सापडलेले कातडे वनविभागाकडे देण्यात येणार असून, ते डेहराडूनच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)