सरूड येथील फुटबॉल स्पर्धेत वाघाची तालीम संघ विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:10+5:302021-02-05T07:06:10+5:30

सरूड : सरूड फुटबॉल क्लबच्या वतीने शाहूवाडी तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील वाघाची तालीम संघाने ...

The tiger training team won the football tournament at Sarud | सरूड येथील फुटबॉल स्पर्धेत वाघाची तालीम संघ विजेता

सरूड येथील फुटबॉल स्पर्धेत वाघाची तालीम संघ विजेता

सरूड : सरूड फुटबॉल क्लबच्या वतीने शाहूवाडी तालुक्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर येथील वाघाची तालीम संघाने अंतिम सामन्यात सरूड एफ.सी.चा १-० गोलने पराभव करत विजेतेपद पटकावले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत सुमारे ३५ संघांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेचे उद्‌घाटन माजी आमदार बाबासाहेब पाटील - सरूडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेमधील द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे सरूड एफ. सी. आणि बांबवडे एफ. सी. यांनी पटकावले. स्पर्धेत बेस्ट गोलकीपर मोनीश लाड (सरूड एफ. सी.), बेस्ट फॉरवर्ड - प्रकाश संकपाळ, बेस्ट डिफेंडर - रोहित भोसले (दोघेही वाघाची तालीम) यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

विजेत्या संघांना व उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी वीरधवल पाटील, सुहास डाकवे, साईराज रोडे, रोहित रोडे, सचिन लाड, करण डाकवे, बंडा भालेकर, पप्पू कांदेकर, रोहन रोडे, गोविंद पाटील (कोल्हापूर ), प्रशांत खामकर, सागर मस्के, विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The tiger training team won the football tournament at Sarud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.