इचलकरंजी : शहर व परिसरामध्ये गुरूवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला.गेले दोन-तीन दिवस उन्हाचा तडाखा वाढला होता. आज तरी दिवसभर नागरिक उन्हाने हैराण झाले होते. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. पाहता पाहता सर्वत्र पाणीच झाले. मात्र, नागरिकांची तारांबळ उडाली. वारा सुटल्याने अनेक झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.पन्हाळगडावर एक तास वादळवाऱ्यासह पाऊसपन्हाळा : पन्हाळगडावर दुपारनंतर सलग एक तास पाऊस पडला. यामुळे नागरिकांना उष्म्यापासून थोडा दिलासा मिळाला. पन्हाळ्यासारख्या थंड हवेच्या ठिकाणी गेले काही दिवस झाले नागरिक उष्म्याने हैराण झाले होते. उष्म्याच्या त्रासाने गडावर पर्यटकांनी पाठ फिरवली त्यातच इंधन टंचाईचे संकटामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. यड्रावमध्ये गारांसह अवकाळी बरसलायड्राव : यड्रावमध्ये अवघ्या अर्ध्या ते पाऊण तास पडलेल्या पावसामुळे दिवसभर जाणवत असलेली तीव्र उष्णता कमी झाली आणि परिसरात आल्हाददायी गारवा निर्माण झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि काही क्षणांतच गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसासोबतच पडलेल्या गारांमुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पांढरट थर दिसून आला. लहान मुलांनी या गारांचा आनंद घेत खेळण्याचा आनंद लुटला.
Web Summary : Kolhapur experienced relief from heat as Panhala, Ichalkaranji, and Yadrav received stormy rain. Ichalkaranji saw strong winds and lightning. Panhala had an hour of rain. Yadrav was hit by hailstorms, creating a joyful scene for children.
Web Summary : कोल्हापुर में गर्मी से राहत मिली क्योंकि पन्हाला, इचलकरंजी और यड्राव में तूफानी बारिश हुई। इचलकरंजी में तेज हवाएं और बिजली देखी गई। पन्हाला में एक घंटे तक बारिश हुई। यड्राव में ओलावृष्टि हुई, जिससे बच्चों के लिए खुशी का माहौल बन गया।