शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कोल्हापुरात उद्या दहीहंडीचा थरार, सांस्कृतिक कार्यक्रमासह लाखोंची बक्षिसे; वाहतूक नियोजनात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 13:57 IST

कोल्हापूर : गोविंदांचा ओसंडून जाणारा उत्साह, स्फूर्तीदायक गीते, कलाकारांचा सहभाग आणि जिंकण्याची ईर्षा असल्या दहीहंडी उत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले ...

कोल्हापूर : गोविंदांचा ओसंडून जाणारा उत्साह, स्फूर्तीदायक गीते, कलाकारांचा सहभाग आणि जिंकण्याची ईर्षा असल्या दहीहंडी उत्सवासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहेत. गुरुवारी म्हणजेच ७ सप्टेंबरला इथे दहीहंडीचे थरावर थर चढणार आहेत.युवाशक्ती दहीहंडी : धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भारतीय जनता पक्षाने गुरुवारी तीन लाख रुपयांची बक्षिसे असलेली युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. दुपारी ४ वाजता दसरा चौकात या स्पर्धेला प्रारंभ होईल. विजेत्या संघाला रोख ३ लाख रुपयांचे पारितोषिक. प्रत्येक पथकाला, तसेच सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकाला १० हजार, तर सात थर रचून सलामी देणाऱ्या पथकाला १५ हजार रुपयांचे पारितोषिक. महिला पथकांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक.शिवसेनेची निष्ठा दहीहंडी : शिवसेनेकडून मिरजकर तिकटी येथे दुपारी ३ वाजता ही निष्ठा दहीहंडी रंगणार आहे. या स्पर्धेत विजेत्या गोविंदा पथकाला एक लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस. दहीहंडीवेळी आकर्षक विद्युत रोषणाई, कलानृत्याचा आविष्कार.गुजरीचा गोविंदा दहीहंडी : न्यू गुजरी मित्र मंडळ गेली ३६ वर्षे जल्लोषात गुजरीचा गाेविंदा ही एक लाखाचे बक्षीस असलेली दहीहंडी दुपारी ४ वाजता सुरू. करवीर गर्जना ढोल-ताशा पथक आणि इंडियाज गॉट टॅलेंटमधील डान्स ग्रुप झिरो डिग्रीचे कलाकार अभिनेत्री जान्हवी व्यास, ढोलकीच्या तालावर फेम लक्ष्मी खैरे त्यांची कला सादर करणार आहेत. ब्रँडेड साउंड सिस्टीम, आतषबाजी, स्पायरो व लाइट शोचेही आयोजन. धान्य व्यापारी मंडळ, लक्ष्मीपुरी : कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळामार्फत १९८२ पासून दहीहंडी उत्सव सुरू.या ठिकाणी रंगेल दहीडंडीचा थरार- शिवसेना, मिरजकर तिकटी, वेळ : दु. ३ वाजता.- धान्य व्यापारी मंडळ, लक्ष्मीपुरी, वेळ : दु. ३:३० वाजता.- धनंजय महाडिक युवाशक्ती, दसरा चौक, वेळ : दु. ४ वाजता.- न्यू गुजरी मित्रमंडळ, गुजरी, वेळ : दु. ४ वाजता.- बावडेकर आखाडा, शिवाजी पेठ, वेळ : दु. ४ वाजता.- छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळ, शिवाजी चौक, वेळ : सायंकाळी ५ वाजता.- मनसे दहीहंडी, गुजरी काॅर्नर, भाऊसिंगजी रोड, वेळ : सायं. ६ वाजता.

वाहतूक नियोजनात बदल

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियोजनात आवश्यक बदल केले आहेत. दहीहंडीचे आयोजन केलेले दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुजरी चौक, मिरजकर तिकटी परिसरात वाहनांना उत्सव काळात प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गांवरील वाहतूक जवळच्या अन्य पर्यायी मार्गांवरून वळविण्यात आली आहे. दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने पार्क करण्यासाठी चित्रदुर्ग मठ, शहाजी कॉलेज, व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा, खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी शंभर फुटी रोड, करवीर पंचायत समिती परिसर, प्रायव्हेट हायस्कूल मैदान, शाहू स्टेडियम आणि शिवाजी स्टेडियमबाहेरील परिसर तसेच बिंदू चौक पार्किंग येथे व्यवस्था केली आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDahi Handiदहीहंडी