वाघबीळ घाटात बर्निंग कारचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:23 IST2021-03-05T04:23:22+5:302021-03-05T04:23:22+5:30

कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरून फुलेवाडी (ता. करवीर) येथील दिलावर पागे आपल्या कुटुंबासमवेत चारचाकी गाडीतून देवदर्शनासाठी पन्हाळ्याकडे जात होते. दुपारी चारचाकी ...

The thrill of a burning car in Waghbil Ghat | वाघबीळ घाटात बर्निंग कारचा थरार

वाघबीळ घाटात बर्निंग कारचा थरार

कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरून फुलेवाडी (ता. करवीर) येथील दिलावर पागे आपल्या कुटुंबासमवेत चारचाकी गाडीतून देवदर्शनासाठी पन्हाळ्याकडे जात होते. दुपारी चारचाकी गाडी नलवडे बंगल्याजवळ आली असताना, अचानक चालत्या गाडीच्या इंजिनमधून धूर आल्याने गाडी थांबविली. त्यानंतर इंजिनचे झाकण उघडले असता त्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीतील पागे कुटुंबियांना सुरक्षितपणे बाहेर काढले. क्षणात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण गाडीने पेट घेतला. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी पाणी आणि मातीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर पडवळवाडीचे माजी उपसरपंच पंडित नलवडे यांनी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला याची माहिती देताच त्यांनी त्वरित घटनास्थळी येत आग आटोक्यात आणली. यावेळी करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी अपघातग्रस्त कुटुंबाला धीर देत विचारपूस केली.

Web Title: The thrill of a burning car in Waghbil Ghat