शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शहरात साकारणार तीन हजार परवडणारी घरे-: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सहा प्रकल्पांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 01:03 IST

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) जिल्ह्यात परवडणारी घरे साकारण्यासाठी सहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून शहर आणि परिसरात तीन हजार घरे साकारण्यात

ठळक मुद्दे नोंदणी होणार सुरू

कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) जिल्ह्यात परवडणारी घरे साकारण्यासाठी सहा प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून शहर आणि परिसरात तीन हजार घरे साकारण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘दालन’ प्रदर्शनाचे अध्यक्ष सचिन ओसवाल आणि ‘क्रिडाई कोल्हापूर’चे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ओसवाल म्हणाले, केंद्र सरकारने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार कोल्हापूरमध्ये ४५ हजार नवीन घरांची गरज आहे. ते लक्षात घेऊन सरकारने परवडणारी घरे साकारण्यासाठी कोल्हापूरमधील सहा प्रकल्पांना ‘पीएमएवाय’ अंतर्गत मंजुरी दिली आहे. त्यापैकी दोन प्रकल्पांना ‘म्हाडा’कडून बांधकाम परवानगी मिळाली आहे. या प्रकल्पांतील घरांसाठी नोंदणीची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात काम लवकरच सुरू होणार आहे. ‘पीएमएवाय’ अंतर्गत घर साकारण्यासाठी सर्वांत पहिली अट म्हणजे त्या ग्राहकाचे ते पहिलेच घर असले पाहिजे. तो कमविता असला पाहिजे. या तीन हजार घरे वन बीएचके आणि टू बीएचकेमध्ये उपलब्ध असणार आहेत. बेडेकर म्हणाले, नागाळा पार्क, कसबा बावडा, फुलेवाडी, रमणमळा, जाधववाडी आणि तपोवन परिसरात हे प्रकल्प सुरू होणार आहेत; त्यामुळे सर्वसामान्यांचे कोल्हापूर शहरात स्वत:चे घर असण्याचे स्वप्न साकारण्यास मदत होणार आहे. ‘दालन’मध्येदेखील ग्राहकांना नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेणार‘दालन’मध्ये कोल्हापूर आणि परिसरातील ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये घर कोणत्या ठिकाणी आणि किती रुपयांपर्यंत हवे आहे, आदी स्वरूपातील माहिती संकलित करणारे अर्ज आम्ही भरून घेणार आहोत. त्यातून रोज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार असल्याचे बेडेकर यांनी सांगितले.अनुदान, सवलती मिळणार‘पीएमएवाय’ अंतर्गत ग्राहकाला दोन लाख ४० हजारांचे अनुदान आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलत मिळणार आहे. कर्जासाठी व्याजदर कमी असणार आहे. ‘जीएसटी’ लागणार नाही. या योजनेमध्ये प्रकल्प मंजूर झालेल्या बांधकाम व्यावसायिकांना अडीच एफएसआय, सरकारी मोजणीमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. प्राप्तीकर घेतला जात नाही; त्यामुळे व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाल्याचे ओसवाल म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPMRDAपीएमआरडीए