हस्तिदंत विक्रीप्रकरणी तिघांना ५ दिवसांची कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:43 IST2021-03-13T04:43:08+5:302021-03-13T04:43:08+5:30
कोल्हापूर : हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या तिघा जणांच्या टोळीला बुधवारी कोल्हापूर वनक्षेत्राच्या भरारी पथकाने अटक केली होती. त्यांना ...

हस्तिदंत विक्रीप्रकरणी तिघांना ५ दिवसांची कोठडी
कोल्हापूर : हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या तिघा जणांच्या टोळीला बुधवारी कोल्हापूर वनक्षेत्राच्या भरारी पथकाने अटक केली होती. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील एका हाॅटेलजवळ हस्तिदंत विकण्यासाठी संशयित माणिक विलासराव इनामदार (५९, रा. परळी निनाई, शाहूवाडी), सागर आबासाहेब साबळे (३२, रा. माले, ता. पन्हाळा), धनंजय केरबा जगदाळे (२१, रा. शिंगणापूर, ता. करवीर) हे तिघे येणार असल्याची माहिती कोल्हापूर वनक्षेत्राच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तिघांना हस्तिदंतासह अटक करण्यात आली. तिघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. अशी माहिती वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी दिली.
फोटो : ११०३२०२१-कोल-फाॅरेस्ट
ओळी : कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या तिघा संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले.