शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आजरा कारखाना निवडणूक: मडिलगे केंद्रावर बोगस मतदान; उद्या निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 16:58 IST

केंद्राध्यक्ष व उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत मडिलगे (ता. आजरा) येथील मतदान केंद्रावर बनावट आधार कार्ड वापरून मतदान करणाऱ्या तीनजणांना पकडण्यात आले. केंद्राध्यक्ष तक्रार देण्यास तयार नसल्याने सभासदांनी मतदान केंद्रातून मतपेट्या घेऊन जाण्यास अटकाव केला. साडेतीन तास मतदान केंद्रातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी केंद्राध्यक्ष पोलिसांत तक्रार दाखल करतील असे सांगितल्यानंतर सभासद शांत झाले.मडिलगे केंद्रावर सुशीला सुभान कुरळे या मतदानाला येण्यापूर्वीच त्यांचे मतदान करण्यात आले. त्यानंतर मतदान अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा मतदान करण्यास परवानगी दिली. अशीच घटना अन्य चार मतदारांबाबत झाल्यानंतर बोगस मतदान करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली. संदीप पाटील यांनी बनावट आधार कार्ड वापरून मतदान करणाऱ्या तिघांना पकडून दिले. मात्र, याबाबत केंद्राध्यक्ष तक्रार देण्यास तयार नसल्याने गोंधळाला सुरुवात झाली.निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ माळवे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली व पोलिसांत तक्रार नोंद करतील व ज्या सभासदांना तक्रार अर्ज द्यायचा असेल त्यांनी द्यावा असे सांगितले. यावेळी केंद्राध्यक्ष व उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी चाळोबादेव आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली.राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बनावट आधार कार्ड वापरून बोगस मतदान केले आहे. तोतयागिरी करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी भिकाजी गुरव यांनी केली. विरोधकांनी ६०० आधार कार्ड बनावट तयार केली होती. बोगस मतदान केल्याचे पकडलेल्या तिघांनी मान्य केले आहे. ब वर्गातील मतदारांना एका मताचा अधिकार असताना अचानक पाच मतांचा अधिकार देण्यात आला, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अशोक चराटी यांनी केली.६०.६८ टक्के मतदानआजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी ६०.६८ टक्के मतदान झाले. ३२७३९ मतदारांपैकी १९८६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ग्रामीण भागात चुरशीने घराघरांतून मतदारांना कार्यकर्ते मतदानासाठी बाहेर काढण्यात आले. आजरा व उत्तूर या शहरी भागात दुपारी मतदानाचा वेग वाढला होता. उद्या, मंगळवारी आजरा पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणी पार पडणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक