शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात जीबी सिंड्रोमचे आतापर्यंत तीन बळी शाहू मिल परिसरातील, सीपीआरकडून महापालिकेला दक्षतेबाबत पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:06 IST

परिसरातील पाण्याचे नमुने तपासण्याची गरज

कोल्हापूर : जीबी सिंड्रोममुळे आतापर्यंत १ जानेवारीपासून कोल्हापूर शहरातील शाहू मिल परिसरातील तिघांचा मृत्यू झाल्याने सीपीआर रुग्णालयाने शुक्रवारी महापालिकेच्या आयुक्तांना याबाबत पत्र देऊन माहिती कळवण्याबाबत सूचना केली आहे. दरम्यान, एका परिसरातील तिघांच्या मृत्यूमुळे या परिसरातील पाण्याचे नमुने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.पुणे येथेही एकाच परिसरातील जीबी सिंड्रोम रुग्णांची संख्या वाढल्यानंतर तेथील दूषित पाण्यामुळे मृत्यूची संख्या वाढल्याचे निष्पन्न झाले. गेल्या महिन्याभरापासून सीपीआरमधील जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सीपीआरमध्ये गेल्या दीड महिन्यात १६ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यामध्ये ११ प्रौढांचा समावेश होता. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून चौघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या व्हेन्टिलेटरवर एकही रुग्ण नाही.

परंतु जानेवारीपासून मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी तिघेजण शाहू मिल परिसरातील आहेत. हे जेव्हा सीपीआरच्या डॉक्टरांच्या लक्षात आले तेव्हा अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी महापालिका आयुक्तांना शुक्रवारी पत्र पाठवले आहे. जीबीएस रुग्णांची माहिती कळवण्याबाबत हे पत्र देण्यात आले असून माहिती आणि पुढील कार्यवाहीसाठी ते सादर करण्यात आले आहे. पुण्यासारखीच परिस्थिती कोल्हापुरात होऊ नये, यासाठी तीन रुग्ण एकाच परिसरातली असल्याने तातडीने सीपीआरने महापालिकेला ही माहिती दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय