शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
4
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
5
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
6
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
7
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
8
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
9
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
10
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
11
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
12
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
13
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
14
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
15
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
16
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
17
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
18
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
19
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
20
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क

सान्वीच्या प्रसंगावधानामुळे वाचले तीन जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:51 IST

सुशांत घोरपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हैसाळ (जि. सांगली) : काळ अंगात संचारलेल्या प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ३२, मूळ रा. कवठेगुलंद, ता. शिरोळ) या जावयाने शनिवारी पहाटे यड्राव (ता. शिरोळ) या सासूरवाडीत मृत्यूही लाजावा, असे हत्याकांड घडविले. पत्नी, सासूसह मेहुणा व विवाहित मेहुणीला संपविताना तीन कुटुंबांची वाताहत केली. आई, आजीला पिसाळलेला सावत्र ...

सुशांत घोरपडे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हैसाळ (जि. सांगली) : काळ अंगात संचारलेल्या प्रदीप विश्वनाथ जगताप (वय ३२, मूळ रा. कवठेगुलंद, ता. शिरोळ) या जावयाने शनिवारी पहाटे यड्राव (ता. शिरोळ) या सासूरवाडीत मृत्यूही लाजावा, असे हत्याकांड घडविले. पत्नी, सासूसह मेहुणा व विवाहित मेहुणीला संपविताना तीन कुटुंबांची वाताहत केली. आई, आजीला पिसाळलेला सावत्र बाप मारत असल्याचे पाहून चिमुकल्या सान्वीने लहान भाऊ गणेशला हाताशी धरले. जवळच झोपलेल्या सहा महिन्यांच्या श्रीधरला उचलून घेत अंधारातच उसाच्या फडाचा आसरा घेतला. तिच्या प्रसंगावधानामुळेच तीन जीव बचावले.कौटुंबिक वादातून शनिवारी पहाटे प्रदीपने यड्राव येथे पत्नी रूपाली प्रदीप जगताप (वय २७), सासू छाया श्रीपती आयरेकर (५५), मेहुणा रोहित श्रीपती आयरेकर (१७) व मेहुणी सोनाली अभिजित रावण (२४) यांची यंत्रमागाच्या लाकडी माराने हल्ला करून हत्या केली.प्रदीप व रूपाली या उभयतांचा हा दुसरा विवाह होता. मृत रूपालीच्या पहिल्या पतीची मुलगी सान्वी (वय ११) ही यड्राव येथे आईजवळच राहत होती. डोळ्यामोर सावत्र बापाच्या डोळ्यात संचारलेला मृत्यू पाहून तिने लहान भाऊ गणेशसह मृत सोनालीचा सहा महिन्यांचा मुलगा श्रीधर याला उचलून घेऊन शेतात धूम ठोकली. त्यांनाही संपविण्याचा प्रदीपचा विचार होता. घाबरलेली सान्वी सकाळीच दोन्ही मुलांसह उसातून बाहेर पडली.आयरेकर यांचे संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा प्रदीपचा डाव होता. सान्वीच्या प्रसंगावधानामुळे तीन चिमुकले जीव बचावले.याशिवाय प्रदीपचा दुसरा मेहुणा अभिषेक कामास गेला असल्यामुळे बचावला. यड्राव येथे सासूरवाडीत चौघांची हत्या केल्यानंतर दुसरा मेहुणा अभिषेक ज्या कारखान्यात कामास आहे, तेथे जाऊन प्रदीपने त्यास बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला; पण तो कारखान्यातून बाहेर न आल्यानेच बचावला.अभिजितला अश्रू अनावरदोन वर्षांपूर्वी सोनालीचा विवाह म्हैसाळ (ता. मिरज) येथील अभिजित रावण याच्याशी झाला होता. बाळंतपणासाठी माहेरी गेलेली सोनाली व सहा महिन्यांचा मुलगा श्रीधर यांना रविवारी अभिजित म्हैसाळ येथे घेऊन येणार होता; पण एका रात्रीत काळाने सोनालीवर घाला घातला, हे सांगताना अभिजितला अश्रू अनावर झाले होते.पोरके बहीण-भाऊ चुलत मामाच्या ताब्यातयड्राव : खुनाच्या प्रकरणात मातृछत्र गमावलेल्या श्रीधर रावण या सहा महिन्यांच्या बालकास त्याचे वडील अभिजित रावण (रा. म्हैशाळ, ता. मिरज) यांनी ताब्यात घेतले, तर सान्वी (वय ११) व गणेश (४) या बहीण-भावाला त्यांचे चुलत मामा रूपेश आयरेकर (रा. शिवाजीनगर, निपाणी) यांनी निपाणीला नेले.चौघांवर अंत्यसंस्कारमृतांच्या नातेवाइकांनी चौघांच्या पार्थिवांवर इचलकरंजीत पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.संशयितास कोठडीइचलकरंजी/यड्राव : संशयित प्रदीप जगताप यास शहापूर पोलिसांनी रविवारी जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्याला पोलिसांनी शनिवारीच सांगलीत अटक केली होती.