Mucormycosis In Kolhapur :  म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात आणखी तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:00 PM2021-06-13T18:00:15+5:302021-06-13T18:04:16+5:30

Mucormycosis In Kolhapur : कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. रविवारी आणखी तिघांचा या म्युकरमायकोसिसने बळी घेतला. नवे ९ रुग्ण आढळले असून १२५ जण उपचार घेत आहेत. मृत्यू झालेले तिघेही सीपीआरमधीलच रुग्ण आहेत.

Three more victims of mucormycosis in the district | Mucormycosis In Kolhapur :  म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात आणखी तीन बळी

Mucormycosis In Kolhapur :  म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात आणखी तीन बळी

Next
ठळक मुद्देम्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात आणखी तीन बळीकोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट

कोल्हापूर: कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. रविवारी आणखी तिघांचा या म्युकरमायकोसिसने बळी घेतला. नवे ९ रुग्ण आढळले असून १२५ जण उपचार घेत आहेत. मृत्यू झालेले तिघेही सीपीआरमधीलच रुग्ण आहेत.

एका बाजूला कोविडचा धोका कमी होत नसताना म्युकरमायकोसिस या आजाराने यात आणखी भरच टाकली आहे. आतापर्यंत या आजाराने जिल्ह्यातील १८ जणांनी जीव गमावला आहे. रोज नवे रुग्ण सापडतच आहेत. रविवारी सकाळपर्यंत सरकारी दवाखान्यात ४, तर खासगीमध्ये ५ अशा एकूण ९ नव्या रुग्णांची भर पडली.

या आजाराची लागण झालेल्यांची आतापर्यंतची संख्या १६५ झाली आहे. त्यातील २२ जण यशस्वी उपचार घेऊन घरी परतले आहेत. सीपीआरमध्ये ८१ जण उपचार घेत आहेत, तर १३ जण यातून बरे झाले आहेत. महापालिका क्षेत्रातील दवाखान्यात ३८ जण उपचार घेत आहेत, तर ६ जणांना डिस्‌चार्ज करण्यात आले आहे.

Web Title: Three more victims of mucormycosis in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.