शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, दोन आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी

By उद्धव गोडसे | Updated: August 10, 2023 18:36 IST

मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले

कोल्हापूर : कॉलेजमधील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना मद्य पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने दोन आरोपींना जादा सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोषी ठरवले. गुरुवारी (दि. १०) दोन्ही आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी आणि साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१८ मध्ये आरोपींनी कोल्हापुरातून मुलींचे अपहरण करून इस्लामपूरमध्ये (ता. वाळवा, जि. सांगली) त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. हर्षल आनंदा देसाई (वय २४, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (वय २४, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन असून, त्याच्यावर बालहक्क न्यायालयात खटला सुरू आहे.सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुली आणि तिन्ही आरोपी कोल्हापुरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोन नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपींनी या मुलींना महावीर गार्डन येथे बोलवून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना इस्लामपूरमधील भाड्याच्या खोलीत घेऊन गेले. तिथे मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.दुस-या दिवशी मुलींच्या अंगावरील दागिने काढून घेऊन ते कोल्हापुरातील एका सराफाला विकले. त्यातून आलेल्या पैशातून मद्यप्राशन करून आणि गांजा ओढून पुन्हा मुलींचा लैंगिक छळ केला. तीन मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिसांत दाखल झाली. तत्कालीन पोलिस अधिकारी स्मिता पाटील यांनी मोबाइल लोकेशनवरून मुलींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव आणि डॉ. प्रशांत अमृतकर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील कुलकर्णी यांनी न्यायालयात १९ साक्षीदार तपासले. साक्षी, पुरावे आणि ॲड. कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तिडके यांनी शिक्षा सुनावली. कॉन्स्टेबल धोंडीराम शिंदे आणि माधवी घोडके यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय