सफाई कामगारांचे तीन कोटी भागवा
By Admin | Updated: September 3, 2014 00:29 IST2014-09-03T00:29:47+5:302014-09-03T00:29:47+5:30
‘रॅमकी’ला आदेश : सहायक कामगारांचा राज्यातील सर्वांत मोठा निकाल

सफाई कामगारांचे तीन कोटी भागवा
कोल्हापूर : ‘रॅमकी इन्व्हायरो इंडिया लिमिटेड’कडे २००७ ते २०११ या क ालावधीत शहरातील कचरा उठाव करण्यासाठी कमी मानधनावर राबणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे तीन कोटी सात लाख रुपये वेतनातील फरकाचे पैसे देण्याचे आदेश आज, मंगळवारी सहायक कामगार आयुक्तसुहास कदम यांनी दिले. इतक्या मोठ्या प्रमाणात किमान वेतनासाठी पैसे देण्याचा सहायक कामगार आयुक्तांनी दिलेला आदेश हा राज्यातील पहिलाच निर्णय आहे. ‘रॅमकी’ने क चरा उठाव करणाऱ्यांना द्यावयाच्या फरकाबाबतची रक्कम ठरविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सहायक कामगार आयुक्तांना दिले होते. महापालिकेतर्फे शहरातील कचरा उठावचा ठेका घेतलेल्या ‘रॅमकी’ने सफाई कर्मचाऱ्यांना अठराशे रुपयांच्या ठोक मानधनावर कामावर घेतले होते. यावेळी ‘रॅमकी’ने किमान वेतन कायद्याचा भंग केल्याची तक्रार मुंबईतील महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनने उच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने किमान वेतन अधिनियमन १९४८ कलम (२०) नुसार किमान वेतन देण्याचे आदेश दिले. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून सहायक कामगार आयुक्तांना किमान वेतनाबाबत निर्णय घेण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. याप्रकरणी गेले चार महिने सुहास कदम यांच्याकडे सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कदम यांनी वरीलप्रमाणे निकाल दिला. (प्रतिनिधी)