तीन अपघातांत तिघे ठार आंबवडे, आवळी, पेरीड येथील घटना : सांगली जिल्ह्यातील दोघांचा मृतांत समावेश
By Admin | Updated: May 15, 2014 01:05 IST2014-05-15T00:56:57+5:302014-05-15T01:05:21+5:30
मलकापूर : मलकापूर-कोकरूड मार्गावरील पेरीड (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतील वळणावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला,

तीन अपघातांत तिघे ठार आंबवडे, आवळी, पेरीड येथील घटना : सांगली जिल्ह्यातील दोघांचा मृतांत समावेश
मलकापूर : मलकापूर-कोकरूड मार्गावरील पेरीड (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतील वळणावर ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात चालक ठार झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले. सुरेश शामराव चौगुले (वय २८, रा. पुसाळे, ता. शाहूवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुरेश चौगुले हा आपला ट्रॅक्टर (एमएच १० ८६५०) घेऊन शेडगेवाडीहून नवीन घरासाठी कापलेली लाकडे घेऊन पुसार्ले गावी येत होता. दरम्यान, ट्रॅक्टर पेरीडच्या हद्दीतील वळणावर उलटला. यामध्ये सहील नामदेव शिराळकर (वय १२), रामू संतू चौगुले (६६, रा. पुसार्ले), सखाराम श्रीपती कडवेकर (४५, रा. निनाईपरळे), सुभाष महादेव पाटील (२९, भेंडपडे), चालक सुरेश शामराव चौगुले हे पाचजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपचार सुरू असताना चालक सुरेश चौगुले यांचा मृत्यू झाला.