हाणामारीत तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:24+5:302021-01-22T04:22:24+5:30
कोल्हापूर : राजेंद्रनगरात गुरुवारी सकाळी युवकांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले. अझरुद्दीन रियाज अरब (वय ३५), कार्तिक ...

हाणामारीत तिघे जखमी
कोल्हापूर : राजेंद्रनगरात गुरुवारी सकाळी युवकांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले. अझरुद्दीन रियाज अरब (वय ३५), कार्तिक दीपक बाटुंगे (वय २२), केतन संजय शिंदे (वय २०) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
अपघातातील जखमीचा मृत्यू
कोल्हापूर : अंबपजवळ झालेल्या अपघातातील जखमीचा गुरुवारी सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दानसिंग नयनकिशोर डोली (वय २४, रा. पेठवडगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबतची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.
मंदिरातील चोरीप्रकरणी संशयित ताब्यात
कोल्हापूर : माळी काॅलनी, टाकाळा परिसरातील मंदिरात बुधवारी मध्यरात्री चोरी झाली. याबाबत राजारामपुरी पोलिसांनी एका सराईत चोरट्यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पितळी घंटा, सीसीटीव्ही कॅमेरा, डीव्हीआर, दानपेटीतील पाचशे रुपये, ॲल्युमिनियम शिडी असा मुद्देमाल पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला आहे, तर दुसरा साथीदार अद्यापही फरारी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील शिराळे हे करीत आहेत.