दोन महिलांसह तिघांना काठीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST2021-09-02T04:49:43+5:302021-09-02T04:49:43+5:30

कोल्हापूर : येथील गंजीमाळमधील राजाराम चौकात पूर्ववैमनस्यातून दोन महिलांसह तिघांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात ...

Three, including two women, were beaten with sticks | दोन महिलांसह तिघांना काठीने मारहाण

दोन महिलांसह तिघांना काठीने मारहाण

कोल्हापूर : येथील गंजीमाळमधील राजाराम चौकात पूर्ववैमनस्यातून दोन महिलांसह तिघांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात श्रीधर प्रकाश लोखंडे (वय ३१ रा. गंजीमाळ) हे जखमी झाले. या हल्ल्लाप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ओमकार पाटील (रा. गंजीमाळ)व त्याचा मित्र प्रितम (पूर्ण नाव नाही) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोखंडे व ओमकार पाटील यांची तोंडओळख आहे. लोखंडे यांच्या मामाचा मुलगा विपुल व ओमकार पाटील, प्रितम यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाला होता. रविवारी रात्री श्रीधर लोखंडे हे आपल्या घराच्या दारात बसले होते. त्यावेळी दोन दिवसांपूर्वीच्या भांडणाचे निमीत्त पुढे करून ओमकार पाटील व प्रितम यांनी लोखंडे यांना काठीने मारहाण केली. त्यावेळी त्यांची आई सीमा व बहीण इच्छा ह्या दोघी वाद सोडवण्यासाठी आल्या असता त्यांनाही ढकलून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात श्रीधर लोंखडे जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Web Title: Three, including two women, were beaten with sticks