वर्षात तीनशे जखमींना जीवदान!

By Admin | Updated: December 7, 2014 00:47 IST2014-12-07T00:41:16+5:302014-12-07T00:47:46+5:30

काळाने गाठलं की वेळेत पोहोचायचं : महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांची धाडसी ‘माणुसकी’

Three hundred injured in the year! | वर्षात तीनशे जखमींना जीवदान!

वर्षात तीनशे जखमींना जीवदान!

माणिक डोंगरे / मलकापूर
अपघात म्हटलं की बघ्यांची गर्दी; पण मदत करणाऱ्यांची वानवा, असे चित्र दिसते. महामार्गावर तर हे चित्र रोजचेच. मात्र, महामार्ग देखभाल विभाग कर्मचाऱ्यांच्या माणुसकीमुळे आजपर्यंत अनेकांना जीवदान मिळालंय. २०१४ या एका वर्षात १४० अपघातांतील सुमारे ३०० जखमींना देखभालच्या कर्मचाऱ्यांमुळे वेळेत वैद्यकीय मदत पोहोचलीय. त्यामुळे त्या जखमींचा जीव बचावलाय. या धाडसी व समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन पोलिसांसह रुग्णालयांनीही संबंधित कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी सन्मान केला आहे.
शेंद्रे ते पेठनाका हा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचा ८४ किलोमीटरचा पट्टा अपघातप्रवण पट्टा समजला जातो़ कऱ्हाड तालुक्यातील ४५ किलोमीटरच्या पट्ट्यात सर्वाधिक अपघात घडल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे़ २०१४ या चालू वर्षात ८४ किलोमीटर पट्ट्यात एकूण १४० लहान-मोठे अपघात झाले आहेत़ त्यामध्ये ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ सुमारे ३०० जण जखमी झाले आहेत़ जखमींपैकी १५३ जणांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या असून अनेकांना आपल्या शरीराचे अवयव गमवावे लागले आहेत़ १४७ किरकोळ जखमी झाले आहेत़
अपघात म्हटलं की मदत हा तातडीचा पर्याय जखमींच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो़ दिवसेंदिवस मदतीची भूमिका लोप पावत असल्यामुळे अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जास्त होते़ अशा बाबींना छेद देत महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी मात्र अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी जातात़ कोणाताही विचार न करता जखमींना तातडीने रूग्णालयात पाठवून देतात़ या त्यांच्या तत्पर सेवेमुळे २०१४ या एका वर्षात सुमारे ३०० जखमींना जीवदान मिळाले आहे़ जखमींना मदत करण्याचे काम हे कर्मचारी रात्री-अपरात्री व चोख पध्दतीने पार पाडत आहेत़ ही त्यांची कार्य तत्परता विचारात घेता कृष्णा रूग्णालयासह इतर रूग्णालय व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आह़े हीच माणुसकी समाजातील इतर तरूणांना आदर्श घेण्यासारखी आहे़

Web Title: Three hundred injured in the year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.