भोगावती नदीत विसर्जन केलेल्या तीनशे मूर्ती बाहेर काढून केल्या दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:05+5:302021-09-21T04:27:05+5:30

कसबा बीड, महे गावातील घरगुती व सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन भोगावती नदी पात्रात भाविकांनी केले होते. गेल्या दोन ...

Three hundred idols immersed in the Bhogawati river were taken out and donated | भोगावती नदीत विसर्जन केलेल्या तीनशे मूर्ती बाहेर काढून केल्या दान

भोगावती नदीत विसर्जन केलेल्या तीनशे मूर्ती बाहेर काढून केल्या दान

कसबा बीड, महे गावातील घरगुती व सार्वजनिक गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन भोगावती नदी पात्रात भाविकांनी केले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये भोगावती व तुळशी नद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली. नदीपात्रात विसर्जित केलेल्या मूर्तीच्या विविध रंगामुळे नद्यांच्या पात्रातील पाणी दूषित होऊ नये तसेच नद्यांच्या पात्रातून मूर्ती बाहेर काढून नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने या गणपतीच्या मूर्ती उघड्यावर पडलेल्या होत्या. या सर्व मूर्ती एकत्र करून महे व बीड ग्रामपंचायतीने संकलन केलेल्या ठिकाणी व्यवस्थितरीत्या पोच करण्यात आल्या.

या उपक्रमात करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, महे गावचे युवा नेते उत्तम पाटील, जगदीश पाटील, राम हुजरे, स्वरूप पाटील, केतन जाधव, गोरक्ष वाघमारे, सचिन पाटील, युवराज बोराटे, संदीप जरग, सुधाकर पाटील, हिंदूराव तिबिले यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ

कसबा बीड - महे दरम्यान भोगावती नदीपात्रातील पाण्यात भाविकांनी विसर्जित केलेल्या तीनशे गणपतीच्या मूर्ती बाहेर काढून दान केल्या. नदी प्रदूषण रोखण्याचा हा उपक्रम राजेंद्र सूर्यवंशी यांनी युवकांच्या सहकार्यातून राबविला.

Web Title: Three hundred idols immersed in the Bhogawati river were taken out and donated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.