पन्हाळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:22+5:302021-01-08T05:18:22+5:30

पन्हाळा : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर सलग ६५ वर्षे बिनविरोध झालेल्या हरपवडे ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लागल्याने ...

Three Gram Panchayats in Panhala taluka unopposed | पन्हाळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध

पन्हाळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध

पन्हाळा : तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर सलग ६५ वर्षे बिनविरोध झालेल्या हरपवडे ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लागल्याने तेथील ही परंपरा खंडित झाली. निवडणूक रिंगणात ७७४ उमेदवार आहेत.

उत्रे, आंबर्डे, सोमवार पेठ या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ४२ ग्रामपंचायतींमध्ये ५७ सदस्य बिनविरोध झाले. एकूण १३७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ५३९ उमेदवारांनी माघार घेतली. आता ३८२ उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यासाठी ७७४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. हरपवडे ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी आमदार चंद्रदीप नरके गटाची ही ग्रामपंचायत सलग ६५ वर्षे बिनविरोध होत होती. ही परंपरा खंडित होऊन यंदा निवडणूक लागली आहे. तालुक्यात बहुतेक ठिकाणी दुरंगी लढती होत असून कोडोली, कळे येथील निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

.........

कोडोलीत बिनविरोधची अपेक्षा पोल

कोडोली ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची अपेक्षा होती. येथे यापूर्वी कोरे विरुद्ध पाटील गट असाच सामना होत होता. आता हे दोन्ही गट एकत्र आल्याने निवडणूक बिनविरोधची शक्यता होती. मात्र येथेही निवडणूक लागली आहे.

Web Title: Three Gram Panchayats in Panhala taluka unopposed