रंकाळा तलावातील तीन डंपर कचरा काढला बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:28+5:302021-06-09T04:29:28+5:30
कळंबा : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने उपनगरातील विविध प्रभागांमधून वाहणारे नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने रंकाळा ...

रंकाळा तलावातील तीन डंपर कचरा काढला बाहेर
कळंबा : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने उपनगरातील विविध प्रभागांमधून वाहणारे नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने वाहू लागल्याने रंकाळा तलावात मोठ्या प्रमाणात घनकचरा मिसळत होता. तलावाच्या काठावर पसरलेल्या या कचऱ्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्याचबरोबर पाण्याचा नैसर्गिक रंग बदलून पाणी हिरव्या रंगाचे होत असल्याने तलावातील जैवविविधता धोक्यात आली होती.
रंकाळा तलावावर बोटिंगचा ठेका चालविणाऱ्या देवराज बोटिंग क्लबचे अमर जाधव व कर्मचारी रवी जाधव, प्रतीक बने, अजित कांबळे, अमोल गायकवाड, किरण कांबळे यांच्या निदर्शनाला ही बाब येताच त्यांनी दोन बोटींच्या सहाय्याने तलावातील तीन डंपर कचरा बाहेर काढला.
फोटो : ०७ रंकाळा तलाव कचरा
रंकाळा तलावातील तीन डंपर कचरा बाहेर काढण्यात आला.