विविध घटनांत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:22 IST2021-03-15T04:22:41+5:302021-03-15T04:22:41+5:30

हिडदर्गी (ता. गडहिंग्लज) येथे गेल्या आठवड्यात पेटलेल्या कचऱ्यात चक्कर येऊन पडल्याने रुक्मीणी कृष्णा कोकीतकर (वय ७०) ही वृद्धा भाजून ...

Three deaths in various incidents | विविध घटनांत तिघांचा मृत्यू

विविध घटनांत तिघांचा मृत्यू

हिडदर्गी (ता. गडहिंग्लज) येथे गेल्या आठवड्यात पेटलेल्या कचऱ्यात चक्कर येऊन पडल्याने रुक्मीणी कृष्णा कोकीतकर (वय ७०) ही वृद्धा भाजून गंभीर जखमी झाल्या होती. त्यांच्यावर गडहिंग्लज प्राथमिक रुग्णालयात उपचार करून बेशुद्धावस्थेत कोल्हापुरात सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

माळवाडी, भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे गुरुवारी (दि. ११) घरी विषारी द्रव्य प्राशन केल्याने अनुराधा पांडुरंग कांबळे (४५) या अत्यावस्थ होत्या. पेठवडगाव येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले असता रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

चिचवडे (ता. करवीर) येथील मच्छिंद्र आनंदा सुतार (३८) यांनी शनिवारी दुपारी आपल्या राहत्या घरानजीक कीटकनाशक प्राशन केले. सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनांची सीपीआर पोलीस चौकीत नोंद झाली आहे.

Web Title: Three deaths in various incidents