रस्ते खुदाईत तीन कोटींचा ढपला : शेट
By Admin | Updated: November 28, 2014 23:43 IST2014-11-28T23:38:02+5:302014-11-28T23:43:38+5:30
खासगी कंपनी व मनपा अधिकाऱ्यांची करामते

रस्ते खुदाईत तीन कोटींचा ढपला : शेट
कोल्हापूर : शहरात एका खासगी कंपनीकडून सुरू असलेल्या केबलच्या खुदाईसाठीचे हवाई सर्वेक्षण केले आहे. याचा प्रति कि लोमीटर १७ लाख ५० हजार रुपये खर्च आहे. परंतु, सर्वेक्षण चुकल्याने या कामात एकूण २० किलोमीटरचा फरक पडत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कंपनीशी मिलीभगत करून तीन कोटींचा ढपला पाडत महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
माहितीच्या अधिकारात मागविलेली कागदपत्रे शेटे यांनी यावेळी सादर केली. शेटे म्हणाले, शहरात पहिल्या टप्प्यात २३ किलोमीटरपर्यंत केबल टाकण्याचे काम सुरू झाले. प्रत्यक्षात हे काम ३३ किलोमीटरचे झाले. ठेकेदाराने हे काम केल्यानंतर रस्ता दुरुस्ती व खुदाईचे पैसे भरल्याची खात्री न करताच पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील ४५ किलोमीटरच्या खुदाईची मंजुरी याच कंपनीला देण्यात आली. आता ४५ किलोमीटरची परवानगी घेऊन कंपनीने ६० कि.मी.पर्यंत खुदाई करून केबल टाकली आहे. रस्ता खुदाई केल्यानंतर यातील फक्त पाच टक्केच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम कंपनीने केले आहे.
त्यामुळे या सर्व खुदाईची व कामाची चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शहर अभियंता व बांधकाम विभागाची आहे.
कंपनीने केबलसाठी ३५ लाख रुपयांचा ‘एलबीटी’ भरलेला आहे. नगण्य ‘एलबीटी’ भरून कंपनीने यातून एक कोटीपेक्षा अधिकचा महापालिकेचा महसूल बुडविला आहे. या सर्व प्रकाराबाबत पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत.
- नगरसेवक भूपाल शेटे