शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरात गांजा ओढताना दोन डॉक्टसह तिघांना अटक, ५० हजारांचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:34 IST

शेंडापार्क येथे उघड्या माळावर गांजा व चरस सेवनप्रकरणी दोन डॉक्टरांसह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी (दि. १९) रात्री उशिरा अटक केली .

ठळक मुद्दे गांजा ओढताना दोन डॉक्टसह तिघांना अटकचरस, कार असा ५० हजारांचा माल जप्त : शेंडा पार्कात कारवाई

कोल्हापूर : शेंडापार्क येथे उघड्या माळावर गांजा व चरस सेवनप्रकरणी दोन डॉक्टरांसह तिघांना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी (दि. १९) रात्री उशिरा अटक केली .याप्रकरणी संशयित डॉ.भुषण चंद्रकांत मिठारी (वय ३१, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर), डॉ. स्वप्निल सुनील मंडलिक ( ३०, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर)व युवराज उर्फ अभि मोहन महाडिक ( ३५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५० ग्रॅमचा गांजा, ७० ग्रॅमचे चरस व कार असा सुमारे ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिसांनी सांगितले की, शेंडा पार्क परिसरात पोलिस रविवारी गस्त घालत होती. पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानूसार शेंडा पार्क येथील माळावर गेले असता संशयित डॉ. भुषण मिठारी, डॉ. स्वप्निल मंडलिक व अभि महाडिक हे तिघेजण अंमली पदार्थ सेवन करत बसल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी या तिघांना पकडले. त्यांच्या ताब्यातील गांजा, चरस जप्त केले. या तिघांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले. संशयित अभि महाडिक हा या दोघांना हे अंमली पदार्थ पुरवित असल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे.अभि महाडिक हा केबल व्यावसायिक आहे तर डॉ. भुषण मिठारी याने नुकतीच बी.एच.एम.एस.ची पदवी घेतली आहे. डॉ.स्वप्निल मंडलिकचा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दवाखाना आहे.

बाबतची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर केदार यांनी दिली. सोमवारी दूपारी या तिघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे, कॉंन्स्टेबल रणजित कांबळे, राहूल मोहिते, संजय जाधव आदींचा सहभाग होता.

दुसरी मोठी कारवाई...दोन महिन्यापुर्वी टाकाळा परिसरातील जलतरण तलावशेजारी असलेल्या बागेमध्ये एका विद्यार्थिनींसह तीन महाविद्यालयीन तरुण अशा चौघेजणांना पोलिसांनी गांजा प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून गांजा राजारामपुरी पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर शेंडा पार्क येथे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसdocterडॉक्टर