तिघा दुचाकी चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:07+5:302021-03-17T04:26:07+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर ते वडणगे या मार्गावर करवीर पोलिसांनी नाकाबंदी कालावधीत तिघा दुचाकी चोरट्यांना अटक केली. गुरुनाथ मालतेश आतनुरे ...

तिघा दुचाकी चोरट्यास अटक
कोल्हापूर : कोल्हापूर ते वडणगे या मार्गावर करवीर पोलिसांनी नाकाबंदी कालावधीत तिघा दुचाकी चोरट्यांना अटक केली. गुरुनाथ मालतेश आतनुरे (वय २२, रा. कसबा बावडा), मुजमिल दावल परकुटे, श्रेयस राजेंद्र पिंजारी (रा. कोल्हापूर) असे त्या तिघा चोरट्यांची नावे आहेत. त्याच्या ताब्यातून जप्त केलेली दुचाकी त्यांनी गगनबावडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले.
नाकाबंदी कालावधीत सोमवारी करवीर पोलीस वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी कोल्हापूर ते वडणगे या मार्गावर रात्री ९ ते ११ वाजण्याच्या सुमारास संशयावरून एका विनानंबरच्या दुचाकीचालकास अडवले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली, त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून संशय वाढल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने आपले नाव गुरुनाथ आतनुरे असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने ती दुचाकी त्याने मुजमिल परकुटे, श्रेयस पिंजारी या दोघा साथीदारांच्या मदतीने चोरल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिघांना अटक केली. हा गुन्हा गगनबावडा पोलिसांकडे वर्ग करून संशयित आरोपी त्यांच्या ताब्यात दिले.