दानोळीत बैलगाडी शर्यतीवरून तिघांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:47+5:302021-07-07T04:30:47+5:30
जयसिंगपूर : बैलगाडी शर्यतीवरून दानोळी (ता. शिरोळ) येथे वृद्धासह तिघांना मारहाणीची घटना घडली. लाथाबुक्क्या, काठी व दगडाचा यामध्ये वापर ...

दानोळीत बैलगाडी शर्यतीवरून तिघांना मारहाण
जयसिंगपूर : बैलगाडी शर्यतीवरून दानोळी (ता. शिरोळ) येथे वृद्धासह तिघांना मारहाणीची घटना घडली. लाथाबुक्क्या, काठी व दगडाचा यामध्ये वापर करण्यात आला. याप्रकरणी आठजणांविरुद्ध जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीची घटना मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली.
रोशन रावसाहेब माने, उदय अरुण माने, रमेश अप्पासोा माने, अमर बाबासोा शिंदे, बंडू अप्पासोा जगदाळे, अल्लू मुजावर, सचिन मदने, दादा बबन माने अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबतची तक्रार संभाजी कृष्णा शिंदे (वय ६४, रा. शिरोळेमळा, दानोळी) यांनी पोलिसांत दिली.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार शिंदे हे मंगळवारी सकाळी आपल्या अंगणात थांबले होते. यावेळी रोशन माने याने शिंदे यांच्या कामगाराच्या पत्नीला मारहाण केली. तर उदय माने याने शिंदे यांच्या पाठीवर काठीने मारहाण करून जखमी केले. यावेळी कामगार रामू हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही संशयित आरोपींनी मारहाण केली. मारहाणीबरोबरच बैलगाडी शर्यती घेतल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सनदी करीत आहेत.