शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:30 IST

ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.

ठळक मुद्देतीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी कोल्हापूरामध्ये मोर्चा काढून दिली धडकअवैध प्रवासी वाहतूक रोखा, प्रादेशिक परिवहनला इशारा

 

कोल्हापूर : ग्रामीण परवानाधारक रिक्षा चालकांना शहर वगळून जिल्हा परवाना द्यावा, यासह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर सात दिवसांत कारवाई करावी. अन्यथा आम्ही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन प्रवासी वाहतूक सुरू करू, असा इशारा कोल्हापूर शहर समस्त तीन आसनी रिक्षा व्यावसायिकांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना मोर्चाद्वारे दिला.गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहरामध्ये तीन आसनी रिक्षा व्यावसायिक हे सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा एक प्रमुख घटक म्हणून प्रवासी वर्गाला सेवा देत आहेत. त्यात शासनाचे सर्व नियम व कर भरून आणि वेळोवेळी भरमसाट वाढविलेला विमा ही ते भरत आहेत. तरीही प्रामाणिक रिक्षाचालकांचा व्यवसाय कोलमडला आहे; त्यामुळे अनेक रिक्षाचालक, मालक कर्जबाजारी झाले आहेत.

त्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी व टाटा मॅजिक सारख्या गाड्यांमध्ये परवान्यापेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात. त्याचा फटका प्रामाणिक रिक्षाचालकांना बसत आहे. याशिवाय प्रवाशांच्या जीवितालाही धोका पोहोचत आहे. यावर कारवाई करा म्हणून वारंवार निवेदन देऊनही ना प्रादेशिक परिवहन व पोलीस खाते दखल घेत नाही; त्यामुळे येत्या सात दिवसांत अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी.

तीन आसनी रिक्षामध्ये ४ प्रवासी वाहतुकीची रितसर परवानगी द्यावी. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बैठक घेऊन विमा हफ्ता कमी करावा, असे न झाल्यास प्रामाणिक तीन आसनी रिक्षाचालकही ‘सविनय कायदेभंग’ अर्थात मध्यवर्ती बसस्थानकापासून पाच प्रवाशांना घेऊन आपला व्यवसाय करतील, असा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आला.या मोर्चात कॉमन मॅन तीन आसनी रिक्षा संघटना, भारतीय जनता पार्टी तीन आसनी रिक्षा संघटना, करवीर आॅटो रिक्षा संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, आदर्श रिक्षा युनियन, शेअर-ए-रिक्षा संघटना, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटना, स्वाभिमान रिक्षा संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी केले. यावेळी सुभाष शेटे, ईश्वर चणी, विजय गायकवाड, जाफर शेख, सरफरुद्दीन शेख, रमेश पोवार, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, संजय भोरे, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर