अत्याचारप्रकरणी शिवनाकवाडीच्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:29 IST2021-08-28T04:29:33+5:302021-08-28T04:29:33+5:30

एका चाळीस वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील चौघांजणावर कुरुंदवाड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. त्यापैकी ...

Three arrested from Shivnakwadi | अत्याचारप्रकरणी शिवनाकवाडीच्या तिघांना अटक

अत्याचारप्रकरणी शिवनाकवाडीच्या तिघांना अटक

एका चाळीस वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील चौघांजणावर कुरुंदवाड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी फरार आहे. नंदू ऊर्फ सदानंद चंद्रकांत खोत (वय २४) , सचिन आण्णाप्पा खोत (३५) आणि सुधीर राजाराम खोत (२९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्वतः पीडित महिलेने कुरुंदवाड पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही अविवाहित असून संशयित आरोपी वर्षभरापासून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होते. पोटात दुखत असल्याने दवाखान्यात तपासले असता ती सात महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे नातेवाइकांनी तिला आस्था बेघर निवारण केंद्र मिरज (जि. सांगली) येथे दाखल केले होते. त्यानंतर तिला सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रसूती होऊन मुलगी जन्माला आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे करीत आहेत.

Web Title: Three arrested from Shivnakwadi