शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत बनावट नोटा बनविणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 13:33 IST

कोल्हापूर : इचलकरंजी येथील दातार मळा येथील एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...

ठळक मुद्देदहा लाखाच्या बनावट नोटा जप्त दैनंदिन व्यवहारात नोटा खपविल्याची कबुली

कोल्हापूर : इचलकरंजी येथील दातार मळा येथील एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

मुख्य संशयित जीवन धोंडिबा वरुटे (वय २४ रा. दातार मळा, लिंबू चौक, इचलकरंजी), त्याचे दोन साथीदार सागर शिवानंद कडलगे (२१ रा. संभाजी चौक, लंगाटे मळा, इचलकरंजी) रोहित राजू कांबळे (१९ रा. दुसरी गल्ली, दातार मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांचेकडून दहा लाख एक हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तीन महिन्यापासून नोटा तयार करुन दैनंदिन व्यवहारात खपविल्या जात होत्या, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैशाचे वाटप होण्याची शक्यता गृहित धरुन बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते यांना इचलकरंजी येथील दातार मळा येथे संशयित जीवन वरुटे हा बनावट नोटांची छपाई करुन व्यवहारात वापरत असल्याची माहिती मिळाली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने दातार मळा परिसरात सापळा रचला.

गुरुवारी त्याच्या घरावर छापा टाकला असता ताब्यातून दोन हजार रुपयांच्या २० बनावट नोटा सापडल्या. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सागर कडलगे, रोहित कांबळे याच्या मदतीने नोटा तयार करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांच्या घराची झडती घेतली असता लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर, कटर मशीन सापडले. त्यांच्या ताब्यातून दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयाच्या एकूण १० लाख १ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. त्या तयार करण्यासाठी वापरलेले १० हजार ५०० रुपयांचे साहित्यही जप्त करण्यात आले.

संशयितांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत बनावट नोटा बनविणारे रॅकेट सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या नोटांचा निवडणुकीत वापर झाला आहे काय, याची चौकशी पोलीसांनी तिघा संशयितांकडे केली असता बनावट नोटा दैनंदिन व्यवहारात खपविल्या जात होत्या, अशी कबुली दिली.

दरम्यान संशयित जीवन वरुटे याच्यावर इचलकरंजी येथे मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, विजय गुरखे, किरण गावडे, उत्तम सडोलीकर, श्रीकांत पाटील, वैभव पाटील, संजय पडवळ यांनी केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर