मारहाणप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:22 IST2021-03-07T04:22:36+5:302021-03-07T04:22:36+5:30

पंकज सुभाष भोपळे (१९), ओंकार श्रीकांत काजवे (२२, दोघे रा. मंगळवारपेठ) व सलमान शहनशाह मुजावर (२१, रा. कलावंत गल्ली) ...

Three arrested for assault | मारहाणप्रकरणी तिघांना अटक

मारहाणप्रकरणी तिघांना अटक

पंकज सुभाष भोपळे (१९), ओंकार श्रीकांत काजवे (२२, दोघे रा. मंगळवारपेठ) व सलमान शहनशाह मुजावर (२१, रा. कलावंत गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. ऋषिकेश सातपुते हा ३ मार्चला सांगली रोडवरून जात असताना बडबडे हॉस्पिटलसमोर पंकज भोपळे, ओंकार काजवे व सलमान मुजावर या तिघांनी त्याला अडविले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच डोके रस्त्याकडेच्या दगडावर जोराने आपटल्याने ऋषिकेश हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सातपुते याच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्यांना अटक केली आहे.

Web Title: Three arrested for assault