पारगड-वाघोत्रे दरम्यान गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या युवकाला राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने कारवाई करून ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उमेश गोविंद आवडण (रा. तुडये) याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पारगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडलेल्या चोरट्या मार्गाने काही व्यक्ती अवैधरित्या गोवा राज्यात तयार झालेल्या व महाराष्ट्र राज्यात परवानगी नसलेली विदेशी मद्याची वाहतूक करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्कला मिळाली. त्यानुसार रविवारी (२४) सापळा रचून मंगळवार (२५)पहाटे तीनच्या सुमारास पारगडकडून येणाऱ्या मारुती अल्टो (कार क्रमांक एमएच ०६- डब्ल्यू ३००६) या कारची तपासणी वाघोत्रे येथे केली असता संबंधित वाहनांमध्ये गोवा बनावटीची विदेशी मद्य भरलेले विविध ब्रॅण्डचे ७५० व १८० मिली क्षमतेचे एकूण ३३ बॉक्स मिळून आले. बाजारभावाप्रमाणे या दारूची १ लाख ७५ हजार २०० इतकी असून वाहनासह सुमारे ३ लाख ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाघोत्रे येथे साडेतीन लाखाची बनावट दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST