कृषी कायद्यांमुळे देशातील अन्न सुरक्षेला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:31+5:302021-09-21T04:26:31+5:30
महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेच्या गडहिंग्लज येथे सांगता समारोहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत ...

कृषी कायद्यांमुळे देशातील अन्न सुरक्षेला धोका
महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे राज्यव्यापी शेतकरी संवाद यात्रेच्या गडहिंग्लज येथे सांगता समारोहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कॉ. सुखदर्शन सिंग (पंजाब), बिहारचे आमदार कॉ. सुदामा प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंग म्हणाले, कृषी कायद्यांमुळे देशातील असंख्य गरिबांना स्वस्त दरात मिळणारे रेशन बंद होणार आहे. सरकारी शाळांमधून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनावरही केंद्र सरकारने टाच आणली आहे.
अदानी, अंबानींच्या गोदामातील अन्नधान्य चढ्या दराने विकत घेणे गरीब जनतेला परवडणारे नाही. त्यामुळे देशात उपासमारीची वेळ आणण्याचे धोरण सरकार राबवत आहे. सुखदर्शन सिंग म्हणाले, अनेक महिन्यांपासून शेतकरी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदीदेखील केंद्र सरकार घेत नाही; परंतु शेतकरी थकलेले नाहीत आणि थांबलेलेही नाहीत ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. देशातील शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे शासनाने तातडीने रद्द करावेत अन्यथा शेतकरी आंदोलनाबरोबरच देशात ‘भाजपामुक्त भारत’चीही मोहीम राबवावी लागेल.
यावेळी कॉ. दत्तात्रय अत्याळकर, राजेंद्र बावके, करणसिंह कोकणे, सुभाष काकुस्ते, किशोर ढमाले, अजित पाटील, बी. के. आम्रे, गोपाळ पाटील, विजय निकम, अतुल दिघे, शांताराम पाटील, अनंत कुलकर्णी, सुधाकर सावंत, सुवर्णा तळेकर, अमृत कोकितकर, धोंडीबा कुंभार, रामजी देसाई, दौलती राणे, गोपाळ गावडे, कृष्णात चौगुले, नारायण राणे, बलदेव चौगुले, एस. जी. पाटील आदी उपस्थित होते.
साठवणुकीवर निर्बंध हवा
व्यापारी आणि भांडवलदार अन्नधान्य साठवणुकीवर शेतकरी कायद्यांमुळे निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे अमर्याद साठवणूक केल्यामुळे त्यांची मक्तेदारी निर्माण होऊन शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची लुबाडणूक करण्यास त्यांना मुभा मिळेल त्यासाठी गोदामात अन्नधान्य साठवणुकीवर शासनाचे नियंत्रण आणि निर्बंध हवेत, असेही राजाराम सिंग यांनी सांगितले.
शेतीमुळेच अर्थव्यवस्था कणखर
शेती हा देशाचा परंपरागत व्यवसाय असून, अनेकवेळा आर्थिक मंदीपासून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम याच व्यवसायाने केले आहे. शेतकरी तोट्यात जाऊनदेखील हा व्यवसाय करण्याचे धाडस करत आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था टिकवत आहे. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था कणखर बनली आहे, असेही राजाराम सिंग यांनी स्पष्ट केले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील पत्रकार परिषदेत कॉ. राजाराम सिंग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बिहारचे आमदार कॉ. सुदामा प्रसाद, कॉ. सुखदर्शन सिंग, दत्तात्रय अत्याळकर, करणसिंह कोकणे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २००७२०२१-गड-०८