संदीप आडनाईककोल्हापूर : पश्चिम घाटातील सर्वात समृद्ध भाग म्हणून ओळख असल्यामुळे कोल्हापुरात येणाऱ्या परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या नैसर्गिक अधिवासांना धोका पोहोचत असल्यामुळे घटत चालली आहे. यंदा वादळ, पाऊस आणि खाद्याची कमतरता या कारणांनी दरवर्षी ऑक्टोबरअखेरीस येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी यंदाही पाठ फिरवली आहे. ही लक्षणे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे.पक्षी निरीक्षक हिमांशू स्मार्त यांच्या चमूने गेल्या काही दिवसांत कळंबा आणि पॉवर ग्रीड परिसरात आलेल्या पक्ष्यांच्या नोंदी केल्या आहेत. त्यांना अनेक स्थलांतरित पक्षी यंदा आढळलेले नाहीत. हे पक्षीप्रेमी २०१४ पासून रंकाळ्यावरच्या नोंदी घेत आहेत. फक्त १५ पक्ष्यांचीच नोंद त्यांच्याकडे २०२५ मध्ये झाली आहे. कोल्हापुरात येणाऱ्या पक्ष्यांमध्ये बहुसंख्येने युरोपियन, सायबेरियन पक्षी आहेत; परंतु आता ही संख्याही कमी झाली आहे. कळंबा, रंकाळा, पन्हाळा, आंबा, राधानगरी, गगनबावडा, चांदोली, तिलारी, आंबोली या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास आहे.कोल्हापुरात नोंदवलेले स्थलांतरित पक्षीपाणपक्षी : पिवळा धोबी, पांढरा धोबी, करडा धोबी, भुवई बदक, साधी तुतारी, कैकर, युरेशियन दलदल हरीण.झुडूपवर्गीय पक्षी : वेळूतला दंगेखोर वटवट्या, ब्लिथचा वेळूतला वटवट्या, काळ्या डोक्याचा कहुआ, सायबेरियन स्टोन चॅट, सुलोही.
ही आहेत कारणे...पाणवठ्याच्या आणि दलदलीच्या कमी झालेल्या जागा, खाद्य वनस्पतीची कमतरता, वाढते प्रदूषण, पाण्याच्या काठावरील मानवी उपद्रव, असुरक्षित निवारा, बेसुमार वृक्षतोड, रस्ते विकास प्रकल्प यामुळे या पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.शहरातील तळ्यांवर मानवी उपद्रव वाढला आहे. रंकाळा, कळंबा येथे फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
रंकाळा आणि कळंबा या दोन तलावांमुळे जैवविविधता टिकून आहे. कोल्हापुरात येणारे बहुतेक पक्षी हे झाडांवर आढळणारे आणि पाण्यात विहरणारे आहेत. यंदा दलदलीच्या जागा आढळत नाहीत, त्यामुळे नियमित येणारे काही पक्षी आढळत नाहीत. - हिमांशू स्मार्त, पक्षी निरीक्षक
Web Summary : Kolhapur sees decline in migratory birds due to habitat destruction. Lack of food, increased human disturbance, and loss of wetlands are key factors, raising environmental alarms.
Web Summary : आवास विनाश के कारण कोल्हापुर में प्रवासी पक्षियों की संख्या में गिरावट देखी गई। भोजन की कमी, बढ़ता मानवीय हस्तक्षेप, और आर्द्रभूमि का नुकसान प्रमुख कारण हैं, जिससे पर्यावरणीय खतरे बढ़ गए हैं।