शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

माऊली चरणी हजारो भाविक नतमस्तक, दर्शनासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 16:26 IST

दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास बुधवारी थाटात सुरुवात झाली. माऊलीच्या जयघोषात भक्तगणांनी सकाळपासून गर्दी करून श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देमाऊली चरणी हजारो भाविक नतमस्तक, दर्शनासाठी गर्दी रात्री लोटांगणांनी नवस फेडणार, चोख नियोजनामुळे जत्रोत्सव उत्साहात

तळवडे : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्री देवी माऊली देवीच्या वार्षिक जत्रोत्सवास बुधवारी थाटात सुरुवात झाली. माऊलीच्या जयघोषात भक्तगणांनी सकाळपासून गर्दी करून श्री देवी माऊलीचे दर्शन घेतले.जत्रोत्सवानिमित्त सकाळी रूढीप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री देवी माऊलीच्या दर्शनास सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री देवी माऊलीचे सुलभ दर्शन घेता यावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य, एसटी वाहतूक, वीज वितरण प्रशासन, पोलीस प्रशासन, राखीव पोलीस दल, होमगार्ड आदींकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.दक्षिण कोकणचे आराध्य दैवत म्हणून श्री देवी माऊलीची ओळख आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भक्तगणांबरोबरच गोवा, कर्नाटक, बेळगाव, मुंबई, कोल्हापूर तसेच अन्य राज्यातून लाखो भाविक माऊलीच्या दर्शनासाठी बुधवारी आले होते. माऊली देवीचे भव्यदिव्य मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. पूर्ण परिसर दुकाने व वाहने यांनी गजबजून गेला होता.यावेळी सोनुर्ली माऊली देवस्थान समिती, देवस्थानचे मानकरी, माऊली भक्तगण मंडळ, सोनुर्ली, मळगाव गावातील ग्रामस्थ, भक्तमंडळ, पोलीस प्रशासन यांच्या अतिशय नियोजनबद्धरित्या सहकार्याने सुलभरित्या भक्तगणांना दर्शन घेता येत होते. भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या माऊली देवीचा महिमा देश-विदेशात पोहोचला आहे.सायंकाळी मळगाव गावाकडून देव वाजत-गाजत माऊली देवस्थानकडे आले. सोनुर्ली व मळगाव या दोन गावचे हे दैवत आहे. अशा या उत्सवाकडे सर्व भक्तगण आवर्जून पाहत असतात.श्री देवी माऊलीची मूर्ती सुबक व आकर्षक वस्त्रालंकारांनी सजविली होती. जत्रोत्सवानिमित्त सोन्याचांदीच्या दागिन्यांनी तिला सजविले होते. देवीचे हे सुवर्णालंकारांनी नटलेले मनोहारी रूप पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग