‘गोकुळ’च्या जिवावर तुंबड्या भरणाऱ्यांनी नैतिकता शिकवू नये

By Admin | Updated: September 6, 2016 01:32 IST2016-09-06T01:22:37+5:302016-09-06T01:32:38+5:30

सतेज पाटील यांचा पलटवार : महाडिक यांचा संघाशी संबंधच काय..?

Those who fill the tumors on 'Gokul' should not teach ethics | ‘गोकुळ’च्या जिवावर तुंबड्या भरणाऱ्यांनी नैतिकता शिकवू नये

‘गोकुळ’च्या जिवावर तुंबड्या भरणाऱ्यांनी नैतिकता शिकवू नये

कोल्हापूर : महादेवराव महाडिक ‘गोकुळ’चे संस्थापक अथवा संचालक नाहीत, मग ते रोज नऊ वाजता संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात कशासाठी बसतात. ‘गोकुळ’चा आधार घेऊन आपला धंदा सुरू ठेवण्यासाठीच ही उठाठेव सुरू असून संघाच्या जिवावर स्वत:च्या तुंबड्या भरणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, असा पलटवार आमदार सतेज पाटील यांनी महाडिक यांच्यावर सोमवारी केला.
महाडिक यांच्या काळ्या कारनाम्यामुळेच ‘गोकुळ’ बदनाम झाले असून उत्पादकांच्या हितासाठी यापुढेही आपला लढा सुरूच राहील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेवरून आमदार पाटील व महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ‘शासकीय जागा हडपणाऱ्यांनी ‘गोकुळ’वर बोलू नये’ अशा शब्दांत महाडिक यांनी रविवारी टीका केली होती. त्याला आमदार पाटील यांनी उत्तर दिले, ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणेच ‘महाडिक कंपनी’चा कारभार आहे. आजपर्यंत स्वत: एकही संस्था स्थापन केलेली नाही. उलट ज्या संस्था चांगल्या सुरू आहेत, त्याठिकाणी घुसणे व त्या ओरबडून
डबघाईला आणणे हाच त्यांचा उद्योग आहे. ‘गोकुळ’मध्ये ते कंत्राटदार म्हणून घुसले आणि काही
वर्षांतच त्यांनी तिथे दुकान थाटले.
दिवंगत नेते चुयेकरसाहेब
यांची पुण्याई व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची प्रामाणिक साथ मिळाल्यामुळेच महाडिक यांचे दुकान सुरू आहे. जिल्हा परिषदेत
अंडी पुरवायचे काम कोणी घेतले? अर्बन बँक समूहातील संचालकांना महापौर करताना महाडिकांनी किती रकमेची कर्जे घेतली? हा इतिहास जिल्ह्णाला माहित आहे.
परजिल्ह्णांतून येऊन महाडिक यांनी आजपर्यंत दादागिरी केली आहे. संस्थापकांच्या हाताला धरून
संस्थांत घुसायचे आणि
काही दिवसांतच संस्थापकांना बाहेर
काढून स्वत:चा धंदा सुरू करायचा, ही त्यांची नीती आहे.
कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, उपऱ्यांना डोक्यावर चढू देत नाही, हा इतिहास आहे. असे असताना महाडिक यांच्यासारख्या उपऱ्यांची दादागिरी किती दिवस कोल्हापूरकर खपवून घेणार? असे सतेज पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Those who fill the tumors on 'Gokul' should not teach ethics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.