शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीची ऊस परिषद शेवटच्या आठवड्यात शक्य, ऊस उत्पादकांना उत्सुकता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 17:35 IST

शनिवारच्या मेळाव्यात तारीख निश्चित होणार

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची २३ वी ऊस परिषद या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारी उदगाव येथे दुपारी १२ वाजता कल्पवृक्ष गार्डनमध्ये होणाऱ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात परिषदेची तारीख निश्चित होणार आहे. दरम्यान, या ऊस परिषदेतील ऊस दराकडे उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या २२ वर्षांपासून जयसिंगपूर येथे ऊस परिषद होते. यामध्ये जाहीर केलेला दर मिळण्यासाठी संघटना टोकाचा संघर्ष करीत असते. या परिषदेला सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यातील शेतकरी हजेरी लावून दरासाठीच्या पुढील लढ्याला सज्ज होतात.यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्येच परिषद होणार आहे. परिणामी सर्वत्र निवडणुकीचे वातावरण असताना परिषदेला किती शेतकरी उपस्थित राहणार आणि त्यामध्ये काय निर्णय होणार यासंबंधी उत्सुकता लागून राहिली आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपी किती द्यावी आणि गेल्या हंगामातील कारखानदारांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे प्रतिटन दुसरा हप्ता ५० आणि १०० रुपये मिळण्यासाठीच्या लढ्याचा निर्णय परिषदेत होणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून बैठकीचे निमंत्रण नाही..केंद्र सरकारच्या शुगर केन कंट्रोलच्या ऑर्डरनुसार एकरकमी एफआरपीचा कायदा कायम करावा, सन २०२२-२३ हंगामातील देय ५० आणि १०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्यास शासनाने मान्यता द्यावी, यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन संघटनेस दिले होते. दरम्यान, शासनाने ५०, १०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्याला शासनाने मान्यता दिली. त्यामुळे हा विषय संपला. पण एकरकमी एफआरपीप्रश्नी नियोजित बैठक गुरुवारी होणे अपेक्षित होते. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संघटनेला बैठकीचे निमंत्रण आले नाही. परिणामी बैठक झाली नाही.

ऊस परिषदेच्या तारखेचा निर्णय येत्या शनिवारच्या मेळाव्यात होईल. ही २३ वी ऊस परिषद आहे. यापूर्वीच्या चार ऊस परिषदा आचारसंहितेमध्येच झाल्या आहेत. त्यामुळे ऊस परिषदेला आचारसंहितेचा काहीही अडथळा येणार नाही. यंदाची ऊस परिषदही मोठ्या ताकदीनेच घेतली जाईल. -राजू शेट्टी, माजी खासदार, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना