शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेघाची कावड उदंड हाय; कोल्हापुरातील गडमुडशिंगी येथील त्रैवार्षिक यात्रेत भाकणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 16:09 IST

देशाच्या राजकारणात भगवा फडकेल 

गांधीनगर : ‘मेघाची कावड उदंड हाय, पांढरीचे रक्षण करीन, बाळगोपाळांना सुरक्षित ठेवीन व रोगराई हटवीन, तसेच भगवा जगावर राज्य करील,’ अशी भाकणूक देवऋषी यांनी केली. या वर्षी पर्जन्यमान समाधानकारक होईल, देशाच्या राजकारणात भगवा फडकंल, पीक पाणीही उदंड होण्याचे भाकीत गडमुडशिंगी येथील श्री धुळसिद्ध बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेतील भाकणुकीत वाशी येथील देवऋषी भगवान पुजारी व गडमुडशिंगी येथील गणपती पुजारी यांनी वर्तवले.या वर्षी धुळसिद्ध बिरदेव त्रैवार्षिक जळयात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांतून हजारो भाविकांनी उपस्थिती दाखवत मोठ्या उत्साहात सर्व धार्मिक कार्यक्रम पार पाडले. यामध्ये रविवारी (दि़ २५) करसिद्ध माळीतून पालखीचे धुळसिद्ध बिरदेव मंदिरात आगमन, रात्री खणाची मेंढी व सोमवारी ( दि़. २६) गुरुशिष्य भेट व २१ गावांतील सुवासिनींचे पूजन करण्यात आले. मंगळवारी (दि २७) रोजी अभूतपूर्व उत्साहात जळ काढण्यात आला. नवीन तयार केलेल्या रथातून कर हातात घेतलेल्या सिद्धांसह मोठ्या संख्येने ढोल-कैताळांच्या निनादात जळविधी पार पडला. बुधवार, दि. २८ रोजी खाटीक बोनी, तर २९ तारखेला गाव बोनीने भाविकांकडून खारा-नैवेद्य गोडा नैवेद्य देवाला अर्पण करण्यात आला. शुक्रवारी (दि. १) आंबील बोनीने यात्रेची सांगता झाली.ग्रामपंचायत प्रशासनाकडून नेटके नियोजन केले. पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतेची व यात्रेतील सर्व दुकानांची व्यवस्था उत्तम राखली होती व संपूर्ण गावात सर्व मंदिरांवर व शिवाजी चौकामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई केली होती़. या संपूर्ण याचा काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गांधीनगर पोलिसांकडून विशेष परिश्रम घेण्यात आले. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे व छत्रपती राजाराम कारखान्याचे संचालक व उपसरपंच तानाजी कृष्णात पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी नेटके नियोजन केले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर