शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वास राष्ट्रपतींना निमंत्रण देणार, कोल्हापूर ते केंब्रिजपर्यंत कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:10 IST

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे यंदाचे वर्ष लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व म्हणून साजरे होणार आहे. यानिमित्त जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू विचारांची महती सांगणारे कार्यक्रम सादर होणार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे यंदाचे वर्ष लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व म्हणून साजरे होणार आहे. यानिमित्त जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू विचारांची महती सांगणारे कार्यक्रम सादर होणार आहेत. त्याची सुरुवात भवानी मंडपात १८ एप्रिलला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाच्या दिवसापासून होत आहे, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.खासदार संभाजीराजे यांनी शताब्दीच्या मुख्य सोहळ्यासाठी राष्ट्रपतींना कोल्हापुरात आणण्याचा शब्द दिला. त्यासाठी राज्य सरकारचे पत्र देण्याची जबाबदारी पालकमंत्री पाटील व मुश्रीफ यांनी घेतली.राजाराम महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहात यासंदर्भात प्राथमिक नियोजनाची बैठक झाली. प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री पाटील, ग्रामविकास मंत्री मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. रमेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता पर्वाच्या लोगोचे अनावरण केले.यावेळी पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी आणखी काही सूचना आल्या तर स्वागतच आहे, हा लोकोत्सव स्वरूपाचा भव्य दिव्य आणि महत्त्वाचा म्हणजे शाहू महाराजांच्या कार्याची महती राज्याला, देशाला आणि जगाला दाखवणारा कार्यक्रम असावा, असे नियोजन करत असल्याचे सांगितले.सर्वसाधारण रूपरेषा

  • १८ एप्रिलला लोकराजा पर्वाची सुरुवात
  • ५ मे रोजी एकाच वेळी शंभर ठिकाणी शाहू विचारांवर व्याख्याने
  • ६ मे रोजी एकाच वेळी शंभर सेकंदांची आदरांजली.
  • ६ मे - शहरातून जन्मस्थळ ते समाधिस्थळ कृतज्ञता फेरी
  • १ ते ५ मे - कोल्हापूर ते मुंबई समता रॅली 

कोल्हापूर ते केंब्रिजपर्यंत कार्यक्रमशाहू महाराजांचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवरील असल्याने जेथे जेथे त्यांच्या स्मृती आहेत, तेथे तेथे कार्यक्रम घेऊन शाहू महाराज नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे ठरले. यात नाशिकमधील पिंपळेश्वरा येथील गणपतराव मोरे यांच्या घरी, नागपूरला बहिष्कृत समाज बैठक, कानपूरला राजर्षी पदवी मिळालेले ठिकाण, धारवाड, बडोदा यांच्यासह केंब्रिज विद्यापीठात एलएल.बी. घेतलेले ठिकाण अशा सर्व ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी पुढाकार घेऊ, असे संभाजीराजे यांनी सांगितले.

शाहू मिल आराखडा तयार

शाहू जन्मस्थळ ६ मेच्या पूर्णत्वास जाणार आहे. दोन दिवसांत त्याचा पाहणी दौरादेखील होणार आहे. शाहू मिल हेच भविष्यातील मोठे स्मृतिस्थळ असल्याने तेथेच या शताब्दीचे जास्तीत जास्त कार्यक्रम घ्यावेत असे आमचे नियोजन असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. शाहू मिलच्या स्मृतिस्थळावर पुढील आठवड्यात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासोबत आढावा बैठक आहे. या आराखड्याचे आचारसंहिता संपल्यावर केशवराव भोसले नाट्यगृहात सादरीकरण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती