सलग तिसऱ्यांदा ‘कोल्हापूर-धनबाद’ रेल्वे फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:28+5:302021-04-30T04:31:28+5:30
कोल्हापूरमधील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथून दि. १६ एप्रिल रोजी कोरोनामुळे पहिल्यांदा कोल्हापूर-धनबाद रेल्वेने परराज्यातील सुमारे ...

सलग तिसऱ्यांदा ‘कोल्हापूर-धनबाद’ रेल्वे फुल्ल
कोल्हापूरमधील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथून दि. १६ एप्रिल रोजी कोरोनामुळे पहिल्यांदा कोल्हापूर-धनबाद रेल्वेने परराज्यातील सुमारे १२०० मजूर रवाना झाले. त्यानंतर दि. २३ रोजी १२५० हून अधिक मजूर गेले. त्यानंतर आज, शुक्रवारी पहाटेच्या धनबादला जाण्यासाठी निघणाऱ्या रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी सायंकाळपासून रेल्वे स्थानकाबाहेर मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांनी गर्दी केली. या रेल्वेने जाण्यासाठी १२५० जणांनी आरक्षण केले, तर २५० जण प्रतीक्षा यादीत होते. त्यामध्ये पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गया, बिहार, राजस्थानमधील मजुरांचा समावेश होता. रेल्वे स्थानकावर थांबलेल्या सुमारे एक हजार जणांना व्हाईट आर्मीच्यावतीने जेवण पुरविण्यात आले. शुक्रवारी पहाटे रेल्वे निघण्याच्या वेळेपर्यंत हे प्रवासी मजूर स्थानकाबाहेर थांबून होते.
फोटो (२९०४२०२१-कोल-मजूर फोटो ०१ व ०२ ) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याने कोल्हापुरात काम करणारे परराज्यांतील मजूर आपआपल्या गावी रवाना होत आहेत. शुक्रवारी पहाटे निघणाऱ्या धनबाद रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी मजूर थांबून होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
===Photopath===
290421\29kol_1_29042021_5.jpg~290421\29kol_2_29042021_5.jpg
===Caption===
फोटो (२९०४२०२१-कोल-मजूर फोटो ०१ व ०२ ) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याने कोल्हापुरात काम करणारे परराज्यांतील मजूर आपआपल्या गावी रवाना होत आहेत. शुक्रवारी पहाटे निघणाऱ्या धनबाद रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात मजुरांनी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)~फोटो (२९०४२०२१-कोल-मजूर फोटो ०१ व ०२ ) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संचारबंदीमुळे रोजगार बंद असल्याने कोल्हापुरात काम करणारे परराज्यांतील मजूर आपआपल्या गावी रवाना होत आहेत. शुक्रवारी पहाटे निघणाऱ्या धनबाद रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरात मजुरांनी गर्दी केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)